अखेर शिक्षकांचे सेवा पुस्तक झाले अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:08+5:302021-02-11T04:37:08+5:30

पवनी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ पवनीच्या शिष्टमंडळाची गटशिक्षणाधिकारी पं.स.पवनी यांच्यासोबत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात ...

Eventually the teacher's service book was updated | अखेर शिक्षकांचे सेवा पुस्तक झाले अद्ययावत

अखेर शिक्षकांचे सेवा पुस्तक झाले अद्ययावत

googlenewsNext

पवनी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ पवनीच्या शिष्टमंडळाची गटशिक्षणाधिकारी पं.स.पवनी यांच्यासोबत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी यांनी ९ फेब्रुवारीला समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वस्त केले होते व या कामासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना पवनी कडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती.त्या अनुषंगाने ठरल्याप्रमाणे वस्तीशाळा स्वयंसेवक,निमशिक्षक यांची सेवापुस्तिकेत नोंद घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी सेवापुस्तिकेत नोंद घेण्याकरीता सहकार्य करून प्रत्येक्षरित्या सेवापुस्तिकेत नोंदी घेण्यात आल्या.

सन २०१७ ला आंतरजिल्हा बदलीने भंडारा जिल्ह्यांतर्गत पवनी तालुक्यात आलेल्या शिक्षकांची रूजू दिनांकाची सेवा पुस्तिकेत यशस्वीरीत्या नोंद घेण्यात आली. एका दिवसातच प्रलंबित समस्या सोडविण्यात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाला यश प्राप्त झाले. याकरिता पं. स. पवनीचे अधीक्षक दिलीप सोनुले, वरिष्ठ सहायक विश्वास बोरकर, सिद्धार्थ शेंडे, नागपुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी एन. डी. शिवरकर, शिवम घोडीचोर, हरिदास घावडे, मुरारी कढव, भोजराम सलामे, रमेश नागपुरे, चैनराव जांभुळकर, लोकेश गायकवाड, सुनील आत्रम यांनी प्रत्यक्ष सहकार्य करून शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविल्या.

Web Title: Eventually the teacher's service book was updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.