अखेर पशुवैद्यकीय अधिकारी झाले नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:23+5:302021-09-05T04:39:23+5:30
चारगांव येथे हजाराच्या वर गाई म्हशी असून, एक वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती नसल्याने पशुपालक कमालीचे त्रासले होते. यातच ...
चारगांव येथे हजाराच्या वर गाई म्हशी असून, एक वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती नसल्याने पशुपालक कमालीचे त्रासले होते. यातच ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार तक्रार व इमारतीत गरजू बेघरांना विसावा देण्याचा इशारा दिला होता. अखेर पशुवैद्यकीय सेवेने पत्रव्यवहार करीत येथे डॉ.परशुरामकर वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्त केले. आता चारगांव सुंदरी येथील पशुपालकांत आनंदाचे वातावरण असून, ग्रामपंचायत कमिटीच्या सदस्यांचे आभार मानले आहे. या प्रयत्नात सरपंच मोहन लंजे, उपसरपंच लता भिवगडे, सदस्य कमेटीचे रूपेश मोटघरे, मनोज जुगनाके, कविता वलथरे, मंगला सोनवाने, नरेश लंजे, सुरेश लंजे, मनिराम लंजे, धनराज बागडे, महागू कापगते, राजकुमार लंजे तंमुस अध्यक्ष, सचिव झोडे, तलाठी शेखर ठाकरे, आशा कार्यकर्ता खोब्रागडे, डॉ.कापगते आदींचा वाटा आहे.