तुमसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By admin | Published: July 1, 2017 12:24 AM2017-07-01T00:24:39+5:302017-07-01T00:24:39+5:30

तुमसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर बुलडोजर फिरविण्यात आला. शुक्रवारी भाजी बाजार, लिंबू चाळ, फ्रुट मार्केट, जुने गंज बाजार परिसरातील भागातील दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले.

Evergreen Encroachment Campaign | तुमसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

तुमसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

Next

दुसऱ्या दिवशीही कारवाई : टॉकीजसमोरचे अतिक्रमण काढण्याची शिवसेनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर बुलडोजर फिरविण्यात आला. शुक्रवारी भाजी बाजार, लिंबू चाळ, फ्रुट मार्केट, जुने गंज बाजार परिसरातील भागातील दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील अवैध बांधकाम व अतिक्रमणावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. लहान दुकानदारात या कारवाईबद्दल रोष व्याप्त आहे.
गुरुवारी अतिक्रमण कारवाई सुरु करण्यात आली होती. तुमसर शहरात अवैध बांधकाम व अतिक्रमण फोफावले आहे. नागरिकांना रस्त्यावरुन चालतांनी याचा फटका बसत होता. अनेक दुकाने रस्त्यावर आल्यासारखी भासत होती. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण तथा अवैध बांधकामांने कहरच केला होता. नगरपरिषदेसमोरील बुक डेपो, कपडा चाळ, शहीद स्मारकाशेजारील लहान दुकाने गुरुवारी हटविण्यात आली.
शुक्रवारी हा बुलडोजर फ्रुट मार्केट समोरील दुकाने, फ्रुट मार्केट परिसर, लिंबू चाळ व भाजी बाजारावर चालला या परिसरात सर्व फुटपाथ दुकाने आहेत. या कारवाईमुळे लहान दुकानदारांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. येथे नगरपरिषद प्रशासनाने त्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. अतिक्रमणधारकांनी सर्वांना समान न्यायाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तुमसर शहरात मेन रोड, सराफा गल्लीतील अतिक्रमण काढावे अशी मागणी जोर धरीत आहे.
शहरात मंगळवारचा आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. आठवडी बाजाराकरीता जागेचा शोध नगरपरिषद प्रशासनाने घेण्याची गरज आहे. जीव धोक्यात घालून भाजी विक्रेते व ग्राहक येथे बाजार करतांनी दिसतात. मागील अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे.
अतिक्रमण काढल्यानंतर नाली व रस्ते तयार करण्याची गरज आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून तुमसरातील बाजारात अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम पालिकाप्रशासन राबवित असली तरी ही मोहिम दरवर्षीप्रमाणे नाममात्र ठरावी काय? अशी चर्चा तुमसरवासीयांमध्ये सुरु झाली आहे. लक्षावधींचा खर्च करुन मोहीम राबविली जाते. मात्र बांधकामासाठी निधीचा वाणवा असल्याची बाब नेहमी सांगितली जाते.

मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन
तुमसर शहरातील श्रीराम टॉकीज समोरील जागा अनेक वर्षांपासून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. सध्या त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, अमित मेश्राम, जगदीश त्रिभूवनकर, नितीन सेलोकर सह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Evergreen Encroachment Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.