देशहितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:17+5:302021-02-05T08:43:17+5:30
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था भंडाराच्या वतीने संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त ...
जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्था भंडाराच्या वतीने संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक अली सैयद होते. अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बिरणवार, अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष युवराज गिरेपुंजे, संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, रामभाऊ कोरे, लालबहादूर काळबांडे, मुकुंदा ठवकर, राधेश्याम आमकर, अशोक मेश्राम, नामदेव गभणे, संध्या गिरेपुंजे संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर, उपाध्यक्ष रमेश काटेखाये, शाखाध्यक्ष अनिल गयगये, भैयालाल देशमुख, राकेश चिचामे, संचालक शंकर नकाते, प्रकाश चाचेरे, विकास गायधने, यामिनी गिरेपुंजे, विजया कोरे उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांनी केले. ते म्हणाले, भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभासदांना १५ लाख रुपये कर्ज देत आहे. कर्जावरील व्याजदर नऊ टक्के करण्यात आलेला आहे. संस्थेमध्ये नवनवीन योजना कार्यान्वित करून सभासदांचे व संस्थेचे हित जोपासण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. यावर्षी वार्षिक आमसभा झालेली नसली तरी सभासदांना लाभांश वाटप करण्यात आलेला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रधान व्यवस्थापक धर्मेंद्र मेहर, व्यवस्थापक योगेश भोयर, लेखापाल नरेंद्र गजभिये व सर्व शाखा व्यवस्थापक, अंतर्गत तपासणी, सहाय्यक लेखापाल व सर्व संस्थेचे कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी संस्थेचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रभाकर तिवाडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन संचालक प्रकाश चाचेरे यांनी केले.