प्रत्येकाने निरोगी शरीरासाठी देखभाल करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:37 PM2018-10-07T21:37:04+5:302018-10-07T21:37:55+5:30
मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत. यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मुलाच्या आजाराबाबत पालकांनी सतर्क राहावे. शासन स्तरावर लहान मुलांना होणाºया आजाराबाबत उपाय व उपचार केले जातात. निरोगी शरीर हे अमूल्य दागिना असून प्रत्येकाने याची देखभाल करावी, असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. विकास मेश्राम यांनी केले.
गोवर रुबेला लसीकरण जनजागरण मोहीम अंतर्गत तथागत पब्लिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात पालकांना माहिती देताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे सुदामे, प्रा. डॉ. अश्ववीर गजभिय, प्रा. विद्या मेश्राम उपस्थित होते.
यावेळी गोवर रुबेला लसीकरण कण्याचे महत्व पालकांना सांगण्यात आले. या लसीकरणाच्या माध्यमातून लहान मुलांना होणाऱ्या गंभीर आजारापासून मुक्त करण्याचे धोरण असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनस्तरावर या योजनेच्या देशातील इतर राज्यात यशस्वी आयोजन झाले असून महाराष्ट्रात लवकरच नऊ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येणार आहे. पालकांनी मुलाच्या पालकत्वाची जबाबदारी म्हणून न चुकता मुलांना लस द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
संचालन श्रावणी मेश्राम व आभार प्रदर्शन ऋतुजा राऊत यांनी केले. यावेळी शहनाज शेख, स्वाती राघोर्ते, बबिता रहांगडाले, प्रीती काळे, मीरा चाचेरे, योगिनी लांजेवार, ज्योती बागडे, राहुल खोब्रागडे, धीरज गोडखे, पूजा बोन्द्रे, अश्विनी निमकर, गीता देशमुख उपस्थित होते.