समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकांनी सामंजस्याने पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:35 PM2017-11-17T23:35:32+5:302017-11-17T23:35:50+5:30
समाजामध्ये अनेक गोरगरीब आहेत. अशा गोरगरिबांना जिल्हा सेवा प्राधिकरण मदतीचा हात पुरवित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : समाजामध्ये अनेक गोरगरीब आहेत. अशा गोरगरिबांना जिल्हा सेवा प्राधिकरण मदतीचा हात पुरवित आहे. अशा घटकांना मोफत सहाय्य देखील मिळत आहे या मोफत विधी सहाय्याचा लाभ गरीब, दुर्बलांनी घ्यावा आणि आपल्या समस्या, सामंजस्य व तडजोडीने सोडविण्याचा प्रयत्न करावा व राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन पवनीचे न्यायाधीश एस.एस. सय्यद यांनी विधी सेवा प्राधिकरण दिनाच्या निमित्ताने केले.
विधी सेवा प्राधिकरण दिनाच्या निमित्ताने तालुका विधी सेवा समिती पवनी पोलीस स्टेशन, शांतता समिती, दक्षता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली पवनी न्यायमंदिर न्यायालयापसून सुरवात झाली. तहसील चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पवनी पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वैनगंगा विद्यालय मार्गे रॅलीचे भ्रमण करण्यात आले.
बॅनर व लाऊडस्पीकरद्वारे लोकांना जनजागृतीचा संदेश देण्यात आला. तसेच मोफत विधी सहाय्य कोणास मिळू शकतो याविषयी देखील रॅलीतून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून संदेश पोहोचविला.
न्या.एस.एस. सय्यद, सह न्यायधीश एस.एम. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, पोलीस निरीक्षक सुनील ताजने, अॅड. महेंद्र गोस्वामी, सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके, सहायक पोलीस निरीक्षक ऋषीकेश चाबूकस्वार, दक्षता समिती सदस्य सुनंदा मुंडले, रंजना वैद्य, किशोर वैद्य, खान गुरूजी, डॉ. विक्रम राखडे, अॅड. बाताईत, अॅड. अनिल देशमुख, अॅड. बावणे, अॅड. सावरकर, अॅड. गजभिये, अॅड. अंबादे, अॅड. भुरे, अॅड. काटेखाये, अॅड. शेंडे, अॅड. त्रिवेणी वाकडीकर या रॅलीमध्ये शामिल झाले होते. रॅलीच्या यशस्वितेकरिता प्रविण साखरे, विवेक मोहतुरे, विशाल भोगे, एस.ए. निमकर, प्रविण साखरकर, प्रकाश साखरकर, गजभिये, कारीकर, चिरभाते, वंजारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केले.