लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपणे गरजेचे

By Admin | Published: January 28, 2017 12:35 AM2017-01-28T00:35:09+5:302017-01-28T00:35:09+5:30

राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाची ओळख असून विविधतेत एकता जपणारा देश म्हणून जगात भारताचा लौकिक आहे.

Everyone needs to be respected for democracy | लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपणे गरजेचे

लोकशाहीचे मूल्य सर्वांनी जपणे गरजेचे

googlenewsNext

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : पोलीस कवायत मैदानावर मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम
भंडारा : राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाची ओळख असून विविधतेत एकता जपणारा देश म्हणून जगात भारताचा लौकिक आहे. लोकशाही मुल्याची जपणूक व बळकटीकरणाची चळवळ या निमित्ताने उभी राहिली आहे. लोकशाहीचे हे मुल्य आपण सर्वांनी जपावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, विजया बनकर, विजय उरकुडे, जी. जी. जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य असून लोकांच्या कल्याणाच्या विविध योजना राज्य शासन राबवित आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून राज्यात शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, तरुण व तरुणी यांना विकासाच्या प्रवाहात आणणाचा शासनाचा मानस आहे. या योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभागाची आवश्यकता असते.
जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने रोख रहित व्यवहारावर आधारित चित्ररथ संचलनात सहभागी करण्यात आला होता, यासोबत कृषि, मतदार दिवस, पशुसंवर्धन व पाणी व स्वच्छता विभागाचे चित्ररथ संचलनात सहभागी होते.
यावेळी पोलीस दलाच्यावतीने ध्वज संचलन करण्यात आले. यावेळी ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी पुरस्कार स्वीकारला.
स्काऊट गाईड क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कुल वरठी, नवभारत हायस्कुल कोथुर्णा, पवन विद्यालय पवनी, जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी यांचा सत्कार करण्यात आला. राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा मध्ये खो-खो मध्ये महिला खेळाडू यांनी तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल पोलीस शिपाई योगिनी घोलर, वनिता कोडापे, माधूरी चामट यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुतन कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Everyone needs to be respected for democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.