प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:38 AM2021-02-09T04:38:03+5:302021-02-09T04:38:03+5:30
भंडारा तालुक्यातील चिखली येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी भंडारा तालुका भाजपा महामंत्री विष्णुदास हटवार, ...
भंडारा तालुक्यातील चिखली येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी भंडारा तालुका भाजपा महामंत्री विष्णुदास हटवार, सातोना येथील शिक्षक सचिन तिरपुडे, युवराज गायधने, तानाजी गायधने, कैलास मेहर, रोहित हटवार, हेमराज वाघमारे, निखिल वाघमारे, रोहित चरडे, युगल हटवार, आकाश वाघमारे, शिवदास हटवार, सचिन हटवार, नेपाल गायधने, ओमप्रकाश वाघमारे, नारायण शहारे, नरेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी युवराज गायधने यांच्या हस्ते शिवाजी लेझीम ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणी कल्याणी निखाडे व सातोना येथील सहायक शिक्षक सचिन तिरपुडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी बोलताना कल्याणी निखाडे यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील अनुभव, तसेच सामाजिक कार्यातून अनेकांना मदत करत असताना आलेल्या अनुभवांविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी भंडारा भाजप तालुका महामंत्री विष्णुदास हटवार यांनी कल्याणी निखाडे यांनी शिवाजी लेझीम ग्रुपतर्फे राबविलेले आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, तसेच परिसरात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांसाठी शिवाजी लेझीम ग्रुप एक हक्काचे व्यासपीठ बनले असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी महिलांना, विद्यार्थी वर्गाला संपर्क साधण्याचे आवाहन केले. सचिन तिरपुडे यांनी आपले शिक्षणाविषयी विचार सांगून तरुणांना शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. संचालन रोहित हटवार यांनी केले, तर आभार नेपाल गायधने यांनी मानले.