प्रत्येकांनी अनाथांचे नाथ बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:29 PM2018-01-20T22:29:59+5:302018-01-20T22:30:34+5:30

बालगृहात राहुन शिक्षण घेणारे विद्यार्थी अनाथ, निराधार, निराश्रीत असतात. देशाच्या विकासात अनाथ मुले मोठे होवुन पुढे देश सेवेसाठी तयार होतील.

Everyone should make the orphan's name | प्रत्येकांनी अनाथांचे नाथ बनावे

प्रत्येकांनी अनाथांचे नाथ बनावे

Next
ठळक मुद्देचरण वाघमारे : चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप

आॅनलाईन लोकमत
भंडारा : बालगृहात राहुन शिक्षण घेणारे विद्यार्थी अनाथ, निराधार, निराश्रीत असतात. देशाच्या विकासात अनाथ मुले मोठे होवुन पुढे देश सेवेसाठी तयार होतील. यासाठी समाजातील नागरीकांनी पुढे येवुन त्यांच्या पालकत्वाची भुमिका स्विकारणे आज गरजेचे आहे. म्हणुन अनाथांचे नाथ बना, असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात केले.
यावेळी आ. वाघमारे यांनी, जिल्हा परिषदेच्या शाळा व खाजगी अनुदानित तथा विना अनुदानित तत्वावर चालणाºया शाळा यांच्यातील गुणवत्तेची दरी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत मेरीटचे शिक्षक असुनसुध्दा विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होतांना दिसत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिक्षकांनी आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहुन अखंड ज्ञानदानाचे कार्य करावे, असे त्यांनी सांगीतले. पालकत्व नसलेल्या बालकांची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी व त्यांना चारित्र्यवान मनुष्य बनविण्याचे प्रयत्न करावे. जिल्ह्यातील विद्यार्थी सक्षम होण्यासाठी भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तापुर्वक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी तीन दिवसीय बाल महोत्सवात क्रीडा, सांस्कृतीक, निबंध, चित्रकला आदी प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण व प्रशस्तीपत्र देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला बाल कल्याण समिती भंडाराच्या अध्यक्ष डॉ. विशाखा गुप्ते, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिल्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद डाबेराव आदी उपस्थीत होते.
कार्यक्रमाला एम.एम. आंबेडारे, संरक्षण अधिकारी एस. डी. माहुरे, विधी सल्लागार एस.एल. धानकुटे, संरक्षण अधिकारी अमित गजभिये, संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे, संरक्षण अधिकारी विलास भेंडारकर, संरक्षण अधिकारी चुन्नीलाल लोथे, संरक्षण अधिकारी शुभांगी कोल्हे, संरक्षण अधिकारी प्रमोद गिºहेपुंजे, डी बी महाकाळकर, डी. डी. रंगारी, आर.आर. बोकडे, नितिन साठवणे जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व कर्मचारी तथा तालुकास्तरावरील संरक्षण अधिकारी कार्यालयातील सहाय्यक व डाटा एन्ट्री आॅपरेटर यांनी सहकार्य केले.

Web Title: Everyone should make the orphan's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.