सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:40+5:302021-01-04T04:29:40+5:30
लाखनी तालुक्याच्या खुनारी-खराशी येथे आयोजित भागवत सप्ताहात ते कथेचे निरुपण करताना बोलत होते. माणसाला आयुष्य कमी आहे. यामुळे भगवंताचे ...
लाखनी तालुक्याच्या खुनारी-खराशी येथे आयोजित भागवत सप्ताहात ते कथेचे निरुपण करताना बोलत होते. माणसाला आयुष्य कमी आहे. यामुळे भगवंताचे नामस्मरण करावे. या जगात हात फक्त माणसाला आहेत. स्नान केल्याने शरीर सुंदर होते, मन हे नामानेसुद्धा होते, चित्त हे ज्ञानाने शुद्ध होते, धन हे दानाने शुद्ध होते, यामुळे दान करावे, याचबरोबर माणसाला काम, क्रोध, मद, मत्सर घालवायचे असेल तर भजन करावे. संत तुकाराम महाराजांनी गाथा ही मनुष्यासाठी लिहिली आहे. हात, बोलणे, हसणे, आनंद, लज्जा, स्मरण, विचार, बुद्धी असे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. पुण्य, कर्म हाच देव आहे, असे त्यांनी सांगितले.
खुनारी-खराशी येथे हनुमान मंदिर देवस्थानात सुरू असलेल्या अखंड हरिनाम भागवत सप्ताहात रामदास बिसेन महाराज आपल्या अमृततुल्य वाणीतून गावकऱ्यांना प्रबोधन करीत आहेत. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ५ वाजता काकड आरती नंतर रामधून, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ सुरू आहे. भागवत सप्ताहात खुनारी खराशी परिसरातील भजनी मंडळ आपल्या संचासह उपस्थिती लावत आहेत.