सर्वांनी एकजुटीने शाळा विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:08 PM2018-02-21T22:08:31+5:302018-02-21T22:08:51+5:30
प्रगत व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकस्तर राबविताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासह शालेय विकास गरजेचे आहे. शाळेशी संबंधित कोणतेही एक घटक शाळेचा सर्वांगीण विकास करू शकत नाही.
आॅनलाईन लोकमत
पवनी : प्रगत व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकस्तर राबविताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासह शालेय विकास गरजेचे आहे. शाळेशी संबंधित कोणतेही एक घटक शाळेचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. त्यामुळे सर्व घटकांच्या एकजुटीने शाळेचा विकास करावा, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांनी केले.
वैनगंगा विद्यालय पवनीच्या डिजिटल क्लासरूममध्ये माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्यांसाठी कार्यपे्ररणा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा प्रमुख ध्येय ठेवून मुख्याध्यापकांनी कार्य करावे व शाळेचा विकास साधताना सहकारी शिक्षक शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य व पालकवर्ग या सर्व घटकांना विश्वासात घ्यावे. सर्वांनी विकासासाठी एकजुटीने कार्य केल्यास शाळेचा चेहरा मोहरा बदलू शकतो, असा विश्वास व्यक्त करताना जि.प. प्राथमिक शाळा काकेपार येथील उदाहरण दिले.. विकासासाठी काम करणाºयांना प्रोत्साहन दिल्या गेले पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी न.प. प्रशासन अधिकारी अरविंद चिलबुले, वैनगंगा विद्यालयाचे प्राचार्य अनिल राऊत, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सुलभक सुनिल मोटघरे यांनी विविध चित्रफिती द्वारे शाळा विकास कसा साधता येईल हे सोदाहरण स्पष्ट केले. प्राचार्य अनिल राऊत यांनी खाजगी शाळांचा विकास संस्था संचालकांचे अखत्यारीत असते, असे स्पष्ट केले. मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर लक्ष केंद्रीत करावा तसेच पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक पालक संपर्क गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. बी.के. मेश्राम यांनी प्रोत्साहनपर भत्ता शिष्यवृत्तीची माहिती दिली. प्रास्ताविक व संचालन सुनिल मोटघरे यांनी केले. आभार संजय नंदुरकर यांनी मानले. तंत्रस्रेही शिक्षक देवानंद घरत, दिपाली बोरीकर उपस्थित होते.