कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाचेच योगदान महत्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:28+5:302021-03-10T04:35:28+5:30
नगर परिषद भंडारा अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व युनिसेफतर्फे भंडारा शहरात कोरोना जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम ...
नगर परिषद भंडारा अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व युनिसेफतर्फे भंडारा शहरात कोरोना जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थितीत महिला बालकल्याण सभापती साधना त्रिवेदी, स्वच्छता सभापती ज्योती मोगरे, प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे, महिला बालकल्याण विभागाच्या उपसभापती आशा उईके, नगरसेवक मधुरा मदनकर, गीता सिडाम यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहर स्तर संघातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गट तसेच महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी महिला दिनानिमित्त शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, स्वानंदी शहर स्तर संघ व आधार शहर उपजीविका केंद्रातील कामकाजाचा आढावा घेऊन महिलांना विविध योजनेबद्दल व स्वतःच्या आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी ललिता बेलपांडे, सुरेखा शेंडे, रंजना गौरी, कुंदा बोरकर, सुनंदा कुंभलकर, विशाखा मेंढे, भावना बोरकर, अनिता भेदे, सूर्यकांता वाडीभस्मे, भावना शेंडे, हेमलता मोटघरे, शाहीन खान, सुनिता ढवळे, हेमलता मोटघरे, शाहीन खान, आशा नागरीकर, सुषमा वरगंटीवार, पौर्णिमा बारापात्रे, रंजना साखरकर यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. संचालन माधुरी शेंडे यांनी केले तर आभार संगीता बांते यांनी मानले.