रेती तस्करीचे पुरावे वन्यजीवच्या सीसीटीव्हीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:38+5:30

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी अधिनस्त यंत्रणा कारवाई करण्यास पुढे येत नाही. आता तर कोका अभयारण्यातून रेती ट्रकची भरधाव वाहतूक केली जाते. यावर वनविभागाने नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर कारवाई करण्याचे अधिकार महसूल आणि पोलीस खात्याला आहे.

Evidence of sand smuggling in CCTV of wildlife | रेती तस्करीचे पुरावे वन्यजीवच्या सीसीटीव्हीत

रेती तस्करीचे पुरावे वन्यजीवच्या सीसीटीव्हीत

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । कोका अभयारण्य, महसूल विभागाच्या दुर्लक्षाने भरधाव वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोका अभयारण्यातून नियमांना बगल देत रेतीची तस्करी खुलेआम सुरु असून या तस्करीचे पुरावे वन्यजीव विभागाने कोका आणि सोनेगाव तपासणी नाक्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. मात्र महसूल विभाग अर्थपुर्ण व्यवहारातून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याचा फटका वन्यजीव विभागाला बसत असून वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी अधिनस्त यंत्रणा कारवाई करण्यास पुढे येत नाही. आता तर कोका अभयारण्यातून रेती ट्रकची भरधाव वाहतूक केली जाते. यावर वनविभागाने नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर कारवाई करण्याचे अधिकार महसूल आणि पोलीस खात्याला आहे. येथे कारवाईच होत नसल्याने अभयारण्यातून भरधाव वाहतूक सुरु आहे.
मुंढरी आणि निलज घाटावरून रेती भरून ट्रक कोका अभयारण्यातून धावतात. दररोज १५ ते २० ट्रक या अभयारण्यातून भरधाव धावत असतात. या प्रत्येक ट्रकची नोंद वन विभागाच्या तपासणी नाक्यावर घेतली जाते. एवढेच नाही तर तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयातही या ट्रकच्या हालचाली कैद होतात. क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहतूक नेहमीचा प्रकार झाला आहे. विशेष म्हणजे बनावट टीपीच्या आधारेही या भागातून वाहतूक केली जाते.
वनविभागाने अनेकदा ट्रक अडवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. परंतु खरी कारवाई करण्याचे अधिकार महसूल विभागाला आहे. वन्यजीवचे कर्मचारी-अधिकारी प्रकरण महसूल विभागाकडे वर्ग करतात. परंतु कारवाई होत नाही. कारवाई झालेले ट्रक - टिप्पर दुसºया दिवशीच रेती तस्करीत दिसून येतात.
या सर्व प्रकाराला आळा घालायचा असेल तर कोका आणि सोनेगाव वननाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेºयाची तपासणी करण्याची गरज आहे. वनविभागाकडे महसूलने मागणी केल्यास त्यांना सीसीटीव्ही फुटेज सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु अर्थपूर्ण संबंधामुळे महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी अशा कारवाईच्या भानगडीत पडत नाही.
मात्र या प्रकारात अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात आले आहे. भरधाव वाहतुकीने वन्यजीवांचा नैसर्गीक अधिवास धोक्यात येत असून टिप्पर चालकांना वनविभागाने कितीही सांगितले तरी ते ऐकण्याच्या स्थितीत नसतात.

कोका अभयारण्यातून होणारी रेती वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनतपासणी नाक्यावर सर्व कागदपत्रांची पाहणी केली जाते. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महसूल विभागाने वन्यजीव विभागाकडे रितसर मागणी केल्यास फुटेज देण्यास आमची तयारी आहे.
-सचिन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका वन्यजीव.

नियमांना तिलांजली
अभयारण्यातून धावणाºया वाहनांसाठी तासी २० किलोमीटरची वेग मर्यादा आहे. परंतु रेतीचे टिप्पर तासे ६० ते ७० किलोमीटर वेगाने धावतात. कारवाई टाळण्यासाठी आणि अधिकारी रेती उत्खनन करण्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेत वाहने वेगाने धावतात. रेती टिप्परसोबतच काही हौसी पर्यटकही विना परवाना शिरून भरधाव वाहन चालवितात. सोनेगाव तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहन चालकांला स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्याचे पालन होत नाही. अनेकदा आक्रमक चालकांकडून येथील कर्मचारी हतबल झाले दिसतात. वनविभागाचे अधिकारी याप्रकारावर कारवाईचा बडगा उभारतात. परंतु कारवाईनंतर काही दिवसात परिस्थिती जैसे थे होते. यासाठीच येथे सीसीटिव्ही लावण्यात आले आहे. परंतु वनविभागाला कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने महसूल किंवा पोलीस अधिकाºयांवर अवलंबून रहावे लागते.

Web Title: Evidence of sand smuggling in CCTV of wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू