ईव्हीएम व्हीव्हीपॅट जागृतीमधून पारदर्शक यंत्रणेचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:45 PM2019-01-01T22:45:57+5:302019-01-01T22:46:16+5:30

मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेषत: महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावे लागले. मात्र आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेनेच प्रदान केला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून यातून निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यप्रणालीचा प्रत्यय येत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

EWM VVPat Awareness of transparency system | ईव्हीएम व्हीव्हीपॅट जागृतीमधून पारदर्शक यंत्रणेचा प्रत्यय

ईव्हीएम व्हीव्हीपॅट जागृतीमधून पारदर्शक यंत्रणेचा प्रत्यय

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय देशमुख : निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक विभागातर्फे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी अन्य देशातील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागला. विशेषत: महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावे लागले. मात्र आपल्या देशातील नागरिकांना मतदानाचा हक्क घटनेनेच प्रदान केला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली असून यातून निवडणूक यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या पारदर्शक कार्यप्रणालीचा प्रत्यय येत असल्याचे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने जिल्हा भर राबविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, मंजुषा दांडगे, सुभाष चौधरी, अभिमन्यू बोधवळ उपस्थित होते. न्या.देशमुख म्हणाले, लोकशाही ही आपली शाई असून ती आपल्याला टिकवायची आहे.
काळाबरोबर सर्वच क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. निवडणूक आयोगानेसुद्धा आपल्या यंत्रणेत अधिक पारदर्शकता यावी म्हणून ईव्हीएम व्हीव्हीपॅटचा अवलंब केला आहे. ही यंत्रणा सामान्य मतदारांना समजावी तसेच वापरता यावी यासाठी हाती घेतलेली जनजागृती मोहीम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे सादरीकरण केले. नव्या यंत्राचा वापर येणाºया निवडणुकीत सर्वच मतदान केंद्रावर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्या. संजय देशमुख यांनी मॉक पोल करून व्हीव्हीपॅट मशीनवर समाधान व्यक्त केले.
चित्ररथाला हिरवी झेंडी
निवडणूक विभागातील तयार करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला न्या. संजय देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. हा चित्ररथ प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जावून ईव्हीएम व्हीव्हीपॅट बाबत नागरिकांना माहिती देणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणार आहे.

Web Title: EWM VVPat Awareness of transparency system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.