शासकीय योजनेपासून माजी सैनिक वंचित
By admin | Published: November 7, 2016 12:45 AM2016-11-07T00:45:47+5:302016-11-07T00:45:47+5:30
देशाची आन-बान-शान असणारे देशासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या सैनिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
सैनिकांची थट्टा : सैनिकी कल्याण बोर्डाने लक्ष देण्याची गरज
जवाहरनगर : देशाची आन-बान-शान असणारे देशासाठी जीवाची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या सैनिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
देश संरक्षणाची धुरा त्यांच्या खांद्यावर शासनकर्त्यांनी दिली. त्या बहादूर भारतीय सैनिकांना रहदारी भागवत मान सन्मानाने स्थानिक प्रशासन जगू देत नाही. याबाबद सर्वसामान्यांना मोठी खंत वाटत आहे. माजी सैनिकांच्या मुलामुलींना शैक्षणिक सवलती दिल्या जातात. मात्र त्यांना रहदारीत सुखाने संसार करण्यासाठी एक छोटेसे घर उभारतात. त्यावर स्थानिक शासनकर्ते घरकर लावीत असतात. वास्तविक पाहता केंद्रशासन निर्णयानुसार माजी सैनिकांना घरकर माफ करण्यात आलेला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन शासन निर्णय संबंधित विभागाकडून प्राप्त झालेला नाही असे सांगून वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे माजी सैनिकांना घरकर भरावा लागत आहे. याबाबत माजी सैनिकांनी शासन निर्णयाची प्रत सोबत अर्ज स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाला दिली असता अर्जाला केराची टोपली दाखविली जात आहे. ही बहादूर भारतीय सैनिकांची क्रूर थट्टा म्हणावी लागेल. याकडे सैनिकी कल्याण बोर्डाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)