भंडाऱ्यात माजी सैनिकांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:46 PM2019-02-26T22:46:36+5:302019-02-26T22:47:23+5:30

ब्रीगेड आॅफ गार्ड कामठी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबीत यांच्या करीता सैनिक मेळाव्याचे आयोजन सामाजिक भवन भंडारा येते आयोजित करण्यात आले.

Ex-servicemen rally in the store | भंडाऱ्यात माजी सैनिकांचा मेळावा

भंडाऱ्यात माजी सैनिकांचा मेळावा

Next

लोकमत न्युज नेटवर्क
भंडारा : ब्रीगेड आॅफ गार्ड कामठी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबीत यांच्या करीता सैनिक मेळाव्याचे आयोजन सामाजिक भवन भंडारा येते आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात पुलवामा येथे आतंकी हमल्यात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिट मौन बाळगून तसेच शहीदांच्या फोटोला पुष्पचक्र अर्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल अरुण नैन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे, मेजर डॉ. श्रीकांत गिरेपुंजे, वैद्यकीय अधिकारी कॅप्टन डॉ. रेड्डी, एक्स सिर्वेसमेन वॉरिअस फॉन्डेशन भंडाराचे समस्त पदाधिकारी व सदस्यगण आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडाराचे कर्मचारी गण, बहुसंख्येने उपस्थित माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय या सर्वांच्या उपस्थित श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर गार्ड रेजिमेन्टल सेंटचे अधिकारी गण व मंचावर उपस्थित मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सदर मेळाव्याचे आयोजनचे उद्देश जसे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सुविधा व सीएसडी कॅन्टीन उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर कर्नल अरुण नेन यांनी माजी सैथनकांच्या अडचणी जाणून घेतल्य. त्यात सुबेदार अ‍ॅडव्होकेट दिवान निर्वाण यांनी माजी सैनिकांचे काही महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले जसे भंडारा येथे ईसीएचएसची सुविधा उपलब्ध करून देणेबाबत व इतर मुद्दे कळविले. यावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. पांडे आणि कर्नल अरुण नैन यांनी सकारात्मक भूमिका घेतली व या मुद्यावर गंभीर असल्याचे सांगितले. हा मुद्दा शासनासोबत अधिक प्रभावित पणे उपस्थित करून असे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी वैद्यकीय तपासनी करून घेतली व मोफत औषोधोपचार घेतला व कॅन्टीच्या सुविधेचा लाभ घेतला. कार्यक्रमात सैनिक कल्याण कार्यालयातर्फे अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमासाठी जिल्हा सैनिक कार्यालयचे कर्मचारी सुरेश घनमारे, अरुण दहेकर, गिरिष शेटे व राजेश उपरकर, सुधाकर लुटे यांनी परिश्रम घेतला तसेच एक्स सर्विसमेन वारिअर्स फॉन्डेंशनचे पदाधिकारी व सदस्यगण या सर्वांनी सहकार्य केले. संचालन सुबेदार अ‍ॅड. दिवाण निर्वाण यांनी केले.

Web Title: Ex-servicemen rally in the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक