माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाखांचा निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:47 AM2019-08-11T00:47:12+5:302019-08-11T00:48:06+5:30

देशावर संकट येवो की अंतर्गत समस्या निर्माण होवो त्याठिकाणी सैनिक प्राणपणाने लढतात. आपत्ती निवारणातही सैनिक अग्रेसर असतात. अशा सैनिक आणि माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून भंडारा येथे माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी येथे केली.

For the Ex-Servicemen's House, it will provide Rs | माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाखांचा निधी देणार

माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाखांचा निधी देणार

Next
ठळक मुद्देपरिणय फुके । ‘सैनिको के सन्मान में, शासन मैदान में’ कार्यक्रमांतर्गत सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशावर संकट येवो की अंतर्गत समस्या निर्माण होवो त्याठिकाणी सैनिक प्राणपणाने लढतात. आपत्ती निवारणातही सैनिक अग्रेसर असतात. अशा सैनिक आणि माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून भंडारा येथे माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रूपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी येथे केली.
विजयश्री चॅरिटेबल ट्रस्ट व एक्स सर्व्हिसमेन वॉरीयर्स फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी येथील साखरकर सभागृहात आयोजित ‘सैनिको के सन्मान में, शासन मैदा में’ या कार्यक्रमांतर्गत आजी-माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मुकेश साकुरे, राष्ट्रसंतांच्या विचाराचे प्रसारक काळे महाराज, विजेश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या जयश्री चरण वाघमारे उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. फुके म्हणाले, माजी सैनिकांच्या सभागृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू होणाºया बीपीसीएल प्रकल्पात वीरपत्नींसाठी १० टक्के जागा उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ९ आॅगस्ट क्रांतीदिन आणि १५ स्वातंत्रयदिन यामध्ये आजीमाजी सैनिकांचा सत्कार करून आयोजकांनी सुवर्णमध्य साधल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात खासदार सुनील मेंढे म्हणाले, माजी सैनिकांचे प्रश्न महत्वाचे असून ते सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. आमदार चरण वाघमारे यांनी आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. माजी सैनिकांचे प्रश्न शासन दरबारी कसोशीने मांडून ते सोडविण्याचे आश्वासन यावेळी आमदार बाळा काशीवार यांनी दिले. यावेळी शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील तसेच आजीमाजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गावून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी देशभक्ती गीतांवर तरूणांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास फडके यांनी केले तर संचालन प्रा. राहूल डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता व त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकार व सैनिक यांच्यातील दुवा लोकप्रतिनिधी -चरण वाघमारे
सरकार आणि सैनिक यांच्यामध्ये लोकप्रतिनिधी दुवा आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या नक्कीच सोडवू, असे या सोहळ्याचे आयोजक विजश्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. जिल्ह्यात बांधण्यात येणाºया सैनिकांच्या सभागृहासाठी आमदार निधीतून भरीव मदत देवू, असेही त्यांनी सांगितले. विजश्री चॅरिटेबल ट्रस्टने आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून आजी-माजी सैनिकांचा गौरव केला. देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाºया सैनिकांचा सत्कार होत असताना सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडत होता. कार्यक्रमाला मेजर डॉ. श्रीकांत गिºहेपुंजे, नंदकिशोर क्षीरसागर, सुभेदार रामचंद्र कारेमोरे, अ‍ॅड. दिवाण निर्वाण, रूपलाल भोंगाडे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: For the Ex-Servicemen's House, it will provide Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.