खोदलेला रस्ता उठला जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:54 PM2018-12-05T21:54:57+5:302018-12-05T21:55:22+5:30
शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता गत वीस दिवसांपासून खोदून आहे. अरुंद रस्त्यावरुन अहोरात्र वाहतुक सुरु असते. या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघात घडत आहेत. जणू जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या कामाला केव्हा सुरुवात होणार याबाबत संभ्रम आहे. एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता गत वीस दिवसांपासून खोदून आहे. अरुंद रस्त्यावरुन अहोरात्र वाहतुक सुरु असते. या मार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघात घडत आहेत. जणू जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या कामाला केव्हा सुरुवात होणार याबाबत संभ्रम आहे. एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहे.
भंडारा ते रामटेक या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक ते खात रोड या रस्त्याचे दुपद्रीकरण केले जात आहे. जिल्हा परिषद चौकात १४ नोव्हेंबर रोजी या रस्त्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. तीन दिवसात मशीनच्या सहाय्याने साई मंदिरपर्यंत या रस्त्याचे एका बाजुला खोदकाम करण्यात आले. रस्ता वेगाने होत असतांना नगर परिषदेने प्रशासनाला पत्र देवून या रस्त्याचे बांधकाम १७ नोव्हेंबरपासून थांबविण्यात आले. तेव्हापासून अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. संपुर्ण रस्ता एका बाजुला खोदून असून त्या रस्त्यालगत बॅरीकेट्स लावण्यात आले आहे.
जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. याच रस्त्यावर शहरातील विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. यातच राष्टÑीय महामार्गावरुन तुमसरकडे जाणारा हा राज्य मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर एसटी बसेससह अवजड वाहनेही धावत असतात. मात्र रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहनांची कोंडी होते. दोन मोठी वाहने परस्पर विरुध्द दिशेने आली तर वाहतुक कोंडी होवून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा या रस्त्यावर अपघातही झाले आहेत.
अपघातासोबतच या परिसरात असलेल्या नागरिकांना खोदलेल्या रस्त्याच्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्या घरासमोर खोदकाम झाले त्यांना आपल्या घरात जानेही कठीण झाले आहे. तर दुसºया बाजुच्या नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरुन आता राजकारणही सुरु झाले आहे. रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु करावे यामागणीसह राष्टÑवादीसह विविध पक्षांनी आंदोलनात्मक भुमिका घेतली. राष्टÑवादीने तर जिल्हा कचेरीवर मोर्चा नेला. परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. आता या रस्त्याचे काम केव्हा सुरु होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. रस्त्याचे काम होईपर्यंत भंडारा शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यातून त्यांची रस्ता झाल्यावरच सुटका होईल.
जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवा
जिल्हा परिषद ते खात रोड या मार्गावरुन अवजड वाहतुक होत आहे. मात्र खोदलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची भिती आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जड वाहतुक दुसºया मार्गाने वळवावी अशी मागणी आहे. या रस्त्यावरुन टिप्पर, बसेस, ट्रक, ट्रॅक्टर जातात. त्यांना या रस्त्याचे काम पुर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक ते तुमसर रोड अशी वाहतुक वळवावी अशी मागणी जिल्हा युवक काँग्रसचे माजी अध्यक्ष प्रसन्न चकोले यांनी केली आहे.
आज बैठक
महामार्गा प्राधिकरण आणि नगरपरिषद यांच्यात या रस्त्याच्या संदर्भात ६ डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेने विविध विकास कामांचा मुद्दा पुढे करुन पत्र दिले होते. त्यावरुन काम थांबविण्या आले. बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.