हनुमान मूर्तीच्या पायव्याचे खोदकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:03+5:302021-01-13T05:32:03+5:30
लाखांदूर : गतवर्षी महाशिवरात्री दिनी लाखांदूरातील चुलबंध नदीतीरावरील शिवतीर्थावर हजारो भाविकांच्या समक्ष तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे ...
लाखांदूर : गतवर्षी महाशिवरात्री दिनी लाखांदूरातील चुलबंध नदीतीरावरील शिवतीर्थावर हजारो भाविकांच्या समक्ष तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या उपस्थितीत ११० फूट उंच हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यावेळी हनुमान चालीसा पठणाचा मनीष सोनी व ग्रुप यांचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता. त्याअनुषंगाने भव्यदिव्य मूर्तीसाठी, प्रत्यक्ष पूजा करून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी रमेश डोंगरे, ताराबाई डोंगरे, देवानंद नागदेवे, नरेश दिवठे, गोपाल भैय्या, दिलीप दिघोरे, गोपाल घाटेकर, लोखंडे, लक्ष्मण बगमारे, कमलेश बोरकर, राजन मेश्राम, सुनील बारसागडे, कांबळे, राजूभाऊ ठाकरे, मुखरू दुपारे, पप्पू मातेरे आदी उपस्थित होते.