केंद्र व राज्य पुरस्कृत महाआवास योजनेत पवनीची उत्कृष्ट कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:37+5:302021-08-17T04:40:37+5:30

भुयार : शासनाच्या कोणत्याही जनकल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर तर जनता कोणत्याही योजनेपासून वंचित राहू शकत ...

Excellent performance of Pawani in Central and State sponsored Mahawas Yojana | केंद्र व राज्य पुरस्कृत महाआवास योजनेत पवनीची उत्कृष्ट कामगिरी

केंद्र व राज्य पुरस्कृत महाआवास योजनेत पवनीची उत्कृष्ट कामगिरी

Next

भुयार : शासनाच्या कोणत्याही जनकल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर तर जनता कोणत्याही योजनेपासून वंचित राहू शकत नाही, हे पवनी पंचायत समितीने सप्रमाण सिद्ध केली.

घरकुलाची गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान २० नोव्हेंबर ते ५ जून या कालावधीत केंद्रपुरस्कृत पंतप्रधान आवास योजना व राज्य पुरस्कृत शबरी व रमाई घरकुल योजना दिलेल्या कालावधीत पूर्ण करून पवनी पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी पवनी पंचायत समीतीच्या खंडविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अक्षय तलमले, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रशांत बागडे, तांत्रिक अभियंता प्रदीप परवतकर, अभियंता रंजित भानारकर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रामरतन वैद्य यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते,जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी सत्कार करून गौरविण्यात आले.

Web Title: Excellent performance of Pawani in Central and State sponsored Mahawas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.