जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:44+5:302021-07-10T04:24:44+5:30

संततधार काेसळलेल्या या पावसाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद करण्यात आली. पाच तालुक्यांतील ३४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. ...

Excessive rainfall in 24 out of 34 revenue boards in the district | जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी

जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी

Next

संततधार काेसळलेल्या या पावसाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद करण्यात आली. पाच तालुक्यांतील ३४ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. माेहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर व लाखनी या तालुक्यांत अतिवृष्टीची नाेंद घेण्यात आली. गत २४ तासांत भंडारा तालुक्यात ५१.३ मिमी, माेहाडी १००.५ मिमी, तुमसर ८४ मिमी, पवनी ९०.२ मिमी, साकाेली ५६.२ मिमी, लाखांदूर १०८ मिमी आणि सर्वाधिक लाखनी तालुक्यात १६८.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१३ मिमी पावसाची नाेंद झाली असून, ती आतापर्यंत काेसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १२८ टक्के आहे. या पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

बाॅक्स

शेतशिवारात पेरणीची लगबग

पावसाअभावी खाेळंबलेल्या पेरणीला गुरुवारी झालेल्या पावसाने गती आली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. शुक्रवारी शेतशिवारात मजुरांची लगबग दिसत हाेती. विशेष म्हणजे शुक्रवारी ऊन पडल्याने पेरणीच्या कामाला वेग आला हाेता. सर्वत्र पेरणी सुरू असल्याचे चित्र दिसत हाेते. तसेच या पावसाने नदी-नाले खळखळून वाहायला लागले आहेत.

Web Title: Excessive rainfall in 24 out of 34 revenue boards in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.