उत्पादन शुल्क व अबकारी विभाग वसुलीच्या नादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:16+5:302021-06-18T04:25:16+5:30
सध्या परिस्थितीत महागाईने डोके वर काढले असून खाद्यतेलाच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खाद्यतेल सध्या १८० ...
सध्या परिस्थितीत महागाईने डोके वर काढले असून खाद्यतेलाच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खाद्यतेल सध्या १८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे. तर पेट्रोल १०३ रुपये व डिझेल शंभरीपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दररोज जीवनश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य जनता, शेतकरी व व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
आजपर्यंत स्वस्त दारू महंगा तेल असे बोलले जात होते. मात्र त्यात सध्या तेलाच्या बरोबरीने दारूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने १८० मिली. देशी दारूच्या बाटलीवर ५२ रुपये किंमत असताना तिची चक्क ८० रुपयाला लाखनी शहरातील देशी दारूच्या दुकानातून विक्री होत आहे, त्यामुळे तळीरामात नाराजीचा सूर पसरला आहे. याबाबत विचारणा केली असता स्टॉक पुराणा है ! महेंगा आया है असे तिथे काम करणाऱ्या नोकराने सांगितले. मात्र किंमत ५२ आणि विक्री ८० म्हणजे सरळ सरळ २८ रुपये एका १८० मिलीच्या दारूच्या बाटलीवर तळीरामांकडून लूट होत असल्याचे चित्र आहे.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी गजरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच तालुक्यातील अबकारी विभागाचे अधिकारी यांचेकडे अमाप संपत्ती असल्याची चर्चा असून त्यांची ईडी व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून चौकशी झाल्यास मोठा घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.