रचियता साहित्य मंचतर्फे बाल वेशभूषा स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:28+5:302021-06-03T04:25:28+5:30
समूहप्रमुख गोपाल दादा फुलउंबरकर यांच्या कल्पनेतून कवयित्री स्वाती दयानंद सेलोकर यांच्या पुढाकारात ही स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक कवयित्री अर्चना ...
समूहप्रमुख गोपाल दादा फुलउंबरकर यांच्या कल्पनेतून कवयित्री स्वाती दयानंद सेलोकर यांच्या पुढाकारात ही स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक कवयित्री अर्चना गुर्वे, प्रज्ञाताई ढमाळ, नम्रता परब, नीशा कापडे, प्रांजली मोहिकर यांनी काम पाहिले. रंगबिरंगी रोषणाई, सुमधुर संगीताच्या सुराने सुरू झालेल्या या ऑनलाईन स्पर्धेत २७ बाल स्पर्धकांनी विविध वेशभूषा करून सहभाग नोंदवला होता. यावेळी कवयित्री प्रियजा राऊत यांची प्रस्तावना केली, तर कवयित्री प्रियंका ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांना नोंदणीकृत रचियता समूहाचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट म्हणून जय सेलोकर, स्वरा फुलउंबरकर, सुयश टाकळीकर, समृध्दी कुलट यांची निवड करण्यात आली; तर उत्कृष्ट वेशभूषा म्हणून वरद डहाके, सृष्टी दवंडे, शुभदा चोथे, अर्णव बोंद्रे, आशिर्या नागुलवार, काव्या राऊत, हर्ष फुलउंबरकर, वागेश्वरी जोशी, समर्थ ढाकणे, शर्वरी फुलउंबरकर, मनस्वी जैन, राजलक्ष्मी जाधव, स्वरोम कुलकर्णी, साक्षी काळे, प्रेरणा अमृतकार यांची निवड करण्यात आली आहे.
संग्राम कांबळे, तन्वी राऊत, पूर्वा गौतम, ऐश्वर्या आकाशकोरे, खनक मुथा, शिवम लांबकाने, उत्प्रेक्षा चौधरी आणि आर्या खरात यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.