वाकल येथे योग शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:36+5:302021-01-17T04:30:36+5:30

पालांदूर : आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मानवाला व्यायामाची नितांत गरज आहे. नैसर्गिकरीत्या शरीरात ऊर्जा तयार करण्याकरिता योग व प्राणायाम ...

Excitement over yoga camp at Wakal | वाकल येथे योग शिबिर उत्साहात

वाकल येथे योग शिबिर उत्साहात

googlenewsNext

पालांदूर : आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मानवाला व्यायामाची नितांत गरज आहे. नैसर्गिकरीत्या शरीरात ऊर्जा तयार करण्याकरिता योग व प्राणायाम खूप यांचे खूप महत्त्व आहे. डॉ. अमित जवंजाळ यांच्या उपस्थितीत योग शिबिराचे आयोजन वाकल येथील ग्रामपंचायत पटांगणात पार पडले. यावेळी गावचे सरपंच टिकाराम तरारे, योगशिक्षक सुनील भाग्यवनी, अंगणवाडी शिक्षिका शीला पाथरीकर, अंगणवाडी सेविका अनिता बोरकर व ग्रामपंचायत सदस्यांसह गावकरी, महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक योग शिबिराला हजर होते.

यात प्राणायाम, कपालभाती यासारखे विविध योगाचे धडे उपस्थितांना योगशिक्षक सुनील भाग्यवनी यांनी दिले.

दिवसेंदिवस वातावरणातील प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. प्रत्येक व्यक्ती आरोग्यप्रति जागृत व्हावा व नैसर्गिकरीत्या त्याला निरोगी जीवन त्याला जगता यावे, याकरिता योग प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे आहे. योग व प्राणायामाबाबत गावकऱ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, त्यांना या विषयाचे ज्ञान मिळावे, निर्व्यसनी जीवन घडावे, या हेतूने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मऱ्हेगावतर्फे वाकल येथे ग्रामपंचायत पटांगणात योग शिबिर उत्साही वातावरणात पार पडले. सरपंच टिकाराम तरारे यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Excitement over yoga camp at Wakal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.