नेरी येथे महिला मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:21+5:302021-02-11T04:37:21+5:30
वरठी : तालुक्यातील स्मार्ट ग्राम व पंडित दीनदयाळ उपाध्याय केंद्रस्तरीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत नेरी च्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ...
वरठी : तालुक्यातील स्मार्ट ग्राम व पंडित दीनदयाळ उपाध्याय केंद्रस्तरीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत नेरी च्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळाव्यात महिलांनी प्रचंड हजेरी लावली. अध्यक्ष म्हणून रंजिता कारेमोरे व प्रमुख पाहुणे म्हणून हर्षा आनंद मलेवार, पंचायत समिती सदस्य आकांक्षा रितेश वासनिक, कविता वासनिक, गिता दमाहे, ब्रम्हकुमारी उषा दीदी, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला कारेमोरे, कविता वैद्य, विजयमाला ढोके उपस्थित होते. यावेळी ग्राम पंचायत अंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभांश निधीचे वाटप करण्यात आले. स्थानिक निधीतून देण्यात येणारे ५ टक्के दिव्यांग निधी ६ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. महिला व बालकल्याण योजनेतून विधवा महिलांना त्यांच्या नाबालिक मुलांच्या संगोपनाकरिता १३ लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला. भ्रूण हत्या होऊ नये व मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून सरपंच आनंद मलेवार यांनी मानधन व स्वनिधीतून सरपंच कन्यारत्न पुरस्कार जाहीर केले होते. या अंतर्गत यावर्षी जन्मलेल्या १३ मुलींच्या पालकांना प्रति १ हजार १०० रुपये वाटप करण्यात आले. कोविड १९ प्रवाभात अनेक कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिली. या सर्व कोरोना योद्धांचा सन्मान ग्राम पंचायतीच्यावतीने करण्यात आला. यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामधील डॉक्टर, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, सफाई कामगार, संगणक परिचालक यांचा समावेश होता. ग्रामसेवक निरंजना खंडाळकर यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक व राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल परमात्मा एक सेवक मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन ग्राम नेरीचे ग्रामसेविका निरंजना खंडाळकर, प्रास्ताविक व आभार सरपंच आनंद मलेवार यांनी मानले. कार्यक्रमाला उपसरपंच रामदास जगनाडे, ग्रामपंचायत सदस्य अजय लांजेवार, कमलेश वैद्य, आनंद गेडाम, लक्ष्मी पालांदुरकर, रिता मेश्राम, प्रतिमा भांडारकर, निरंजना हजारे, साधना पडोळे, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीराम वैद्य, केशव देशमुख, दीपक ढोमणे, अनिल पडोळे, संजय हजारे उपस्थित होते.