शास्त्री विद्यालयात नवसत्राचा उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:52+5:302021-06-29T04:23:52+5:30
भंडारा : शैक्षणिक २०२१-२२ ची सुरुवात स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अत्यंत उत्साहात करण्यात आला. ...
भंडारा : शैक्षणिक २०२१-२२ ची सुरुवात स्थानिक लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अत्यंत उत्साहात करण्यात आला. सत्राचा प्रारंभ माता सरस्वती व शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली करण्या-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. प्राचार्या केशर बोकडे यांनी माल्यार्पण केले. कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख एस. जी. यावलकर व माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे यांनी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचा-यांना नवसत्राच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊन शाळा मुलांच्या आगमनाने सुरू होईल, पुनश्च शाळेच्या परिसरात किलबिल ऐकू येईल, शिक्षण व्यवहार सुरळीत होईल, असा आशावाद प्राचार्य केशर बोकडे यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून आपण सर्व सुरक्षित राहुया, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सत्राचा प्रारंभ करण्यात आला.