अफरातफर आरोपातून संचालक निर्दोष
By admin | Published: May 7, 2016 01:00 AM2016-05-07T01:00:24+5:302016-05-07T01:00:24+5:30
भंडारा जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक शंकर उपासे यांच्यावर दीड कोटी रूपयांची अफरातफतर करण्याचा आरोप लावण्यात आला होता.
भंडारा : भंडारा जिल्हा दुध संघाचे कार्यकारी संचालक शंकर उपासे यांच्यावर दीड कोटी रूपयांची अफरातफतर करण्याचा आरोप लावण्यात आला होता. याप्रकरणी सहकार न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. शेख यांनी त्यांची निर्दोष सुटका केली आहे. जिल्हा दुध संघाला उपासे यांना निलंबित केल्यापासून वेतनासह अन्य लाभाची नुकसान भरपाई द्यावे, असे निर्देश दिले आहे.
भंडारा जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे कार्यकारी संचालक शंकर उपासे हे १९९१ पासून कार्यरत आहेत. दरम्यान २००६ च्या निवडणुकीनंतर विलास काटेखाये हे संघाचे अध्यक्ष झाले. संघाचे बॉयलॉज व कर्मचारी सेवानियमाचा उल्लंघन केले. अशाच कारवाईत शंकर उपासे यांच्यावर दीड कोटी रूपयांच्या अफरातफरीचा आरोप करून त्यांना सेवेतून बडतर्फ केले.
याबाबत चार सदस्यीय समितीचे गठण केले. यात तक्रारदार राम गाजीमवार यांचा समावेश आहे. चौकशी समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या समितीने उपासे यांना संघाचे सेवेतून बडतर्फ करावे व रक्कम वसुल करावे असा अहवाल दिला. याविरूध्द उपासे यांनी सहकारी न्यायालयात दाद मागितली. यात न्यायालयाने उपासे यांची बाजू समजून घेत चौकशी समितीच्या निर्णयाला बेकायदेशीर व न्यायायलाच्या कक्षेबाहेर असल्याचा निवाळा दिला.
सहकार न्यायाधीश आर. एस. शेख यांनी निकाल देताना, अर्जदार शंकर उपासे यांची बाजू मान्य केली. चौकशी समितीचा २२ जानेवारी २००७ चा अहवाल बेकायदेशीर, चुकीचा असल्याने रद्द केला. तसेच त्यांच्या बडतर्फीचा आदेशही रद्द करून त्यांचे निलंबन केल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंतचे वेतन, ग्रॅच्युईटी व प्राव्हिडंट फंड ची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
(शहर प्रतिनिधी)