थकीत वीजबिल झाल्याने पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:36 AM2021-03-17T04:36:04+5:302021-03-17T04:36:04+5:30

येथे दोन कनिष्ठ अभियंता कार्यालये आहेत. याअंतर्गत आजूबाजूच्या खेडेगावातील वीज पुरवठा सुरळीत ठेवला जातो. सध्या दर महिन्याला वीजबिल ग्राहकाला ...

Exhausted electricity bills led to increased supply disruptions | थकीत वीजबिल झाल्याने पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वाढले

थकीत वीजबिल झाल्याने पुरवठा खंडित करण्याचे प्रकार वाढले

Next

येथे दोन कनिष्ठ अभियंता कार्यालये आहेत. याअंतर्गत आजूबाजूच्या खेडेगावातील वीज पुरवठा सुरळीत ठेवला जातो. सध्या दर महिन्याला वीजबिल ग्राहकाला येत आहे. या बिलात स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार तसेच वीज शुल्क १६ टक्के आकारून वीजदेयक ग्राहकास मिळत आहे. ते गरिबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे थकीत होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. आधी तीन महिन्यांचे बिल जेवढे येत होते, तेवढे आज दर महिन्याला येत आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यास गरीब लोकांचे कंबरडे मोडत आहे. यामुळे थकीत प्रमाण अधिक जास्त प्रमाणात वाढत आहे. अशावेळी वरिष्ठ वीज कर्मचारी यांना बिल वसूल करण्यात सांगितले जात आहे. दोन महिन्यांचे बिल थकीत झाले, तर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे लोकांना रात्री अंधारात झोपावे लागत आहे. वीज पुरवठा खंडित करण्याआधी वीज पारेषण कंपनीकडून नोटीस बजावली जाणे आवश्यक आहे, परंतु तसे न करता थकीत पुरवठा खंडित केले जाते.

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी वाढत आहे. शरद रोकडे (रा. कोसरा) यांचे घरगुती वीजबिल न भरल्याचे कारण देत १५ मार्चरोजी सायंकाळी त्यांची वीज कापली. ते वीजबिल भरायला तयार होते, तरीदेखील पुरवठा खंडित केला. त्यामुळे त्यांना रात्र अंधारात काढावी लागली. या सर्व प्रकारामुळे वीज कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यातून त्यांच्यावर हल्ला केला जात आहे. कोंढा येथे अशी घटना घडली होती. यातून मार्ग काढून थकीत वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस देणे तसेच थकीत बिल भरण्याची त्वरित व्यवस्था कर्मचारी यांच्याकडे ठेवण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.

Web Title: Exhausted electricity bills led to increased supply disruptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.