विद्यमान सरकार उद्योगपती व व्यापाऱ्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:54 PM2018-11-26T22:54:48+5:302018-11-26T22:55:21+5:30
भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. सद्याच्या सरकारने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद केली. अनेकदा या सरकारला याविषयी माहिती देऊन शिष्यवृत्ती सुरु करण्याची मागणी देखील केली. मात्र सध्याची सरकार ही गोरगरिबांची सरकार नसून ही मोठे उद्योगपती व व्यापाºयांची सरकार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
तालुक्यातील मासळ येथे रविवारला भंडारा जिल्हा बँकेच्या वतीने एटीएमचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री विलास श्रूंगारपवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश डोंगरे, इंजी.सुरेश ब्राम्हणकर, मनोहर महावाडे, जिल्हा प.सदस्या शुद्धमता नंदागवळी, सरपंचा सवीता लेदे, जि.प.सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, सत्यवान हुकरे, सदाशीव वलथरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सेवक वाघाये यांनी भाजप सरकारने ओबीसी समाज आणि बहुजन समाजाचे पार वाटोळे केले आहे. या सरकारने घोषणा केली की, दरवर्षी २ कोटी नोकºया उपलब्ध करुन देणार, परंतु प्रत्यक्षात मात्र यांची पाटी कोरीच राहीली आहे. ओबीसी समाजाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष नात्याने ओबीसी समाज व बहुजन समाजाच्या लढा लढत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचत, आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर असून शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. एटीमचे उद्घाटन करण्यासाठी एकत्रीत आलो असलो तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. या परिसरातील शेतकरी हा कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळाने पार खचला आहे. ज्याच्या खिशातच पैसे नसतील तर एटीएम मधून पैसे कुठून काढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. संचालन निशाद लांजेवार यांनी तर, आभार उदय भैय्या यांनी केले. कार्यक्रमासाठी राकाँ तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, सरपंच उत्तम भागडकर, रतीराम मेंढे, छगण गोंडाणे, देवा राऊत, सुभाष खीलवानी यांनी सहकार्य केले.