तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:49 AM2018-08-20T00:49:12+5:302018-08-20T00:51:35+5:30
तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण झाले नाही ही बाब शिष्टमंडळाने विशद केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण झाले नाही ही बाब शिष्टमंडळाने विशद केली.
तिरोडी रेल्वे स्थानक मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात असून तुमसर रेल्वे स्थानकापासून सुमारे ५२ कि.मी. अंतरावर आहे. तिरोडी कटंगी केवळ १३ कि.मी. विस्तारीत केली तर नागपूर तुमसर, तिरोडी कटंगी बालाघाट सरळ विस्तारीत होवून महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील व्यापारी, विद्यार्थी तथा सर्वसामान्यांना याचा लाभ होईल. उत्तर भारतात कमी वेळेत जाणारा हा एकमेव रेल्वेमार्ग ठरणार आहे.
उच्च दर्जाचे मॅग्नीज खाणी असल्याने लोह उद्योगाला मोठी चालना मिळेल.
तुमसर टाऊन मुख्य रेल्वे स्थानिक निर्माण करून मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याची मागणी माजी खा.डॉ.खुशाल बोपचे, डॉ.चंद्रशेखर भोयर, सुरेश कापसे, गंगाधर कावळे, नितीन ठेनगडी, अनिल संभवानी, संजय नावरकर, अकरम शेख, अरुण कहालकर, राजाराम ताजणे यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला मागण्या पूर्तीचे आश्वासन दिले.