धडक सिंचन विहिरीची मुदतवाढ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:26+5:302021-01-15T04:29:26+5:30
भुयार : कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी विहिरीचे पूर्ण काम होऊनही निधीअभावी धनादेशासाठी संबंधित कार्यालयात चकरा मारत आहेत. ...
भुयार : कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी विहिरीचे पूर्ण काम होऊनही निधीअभावी धनादेशासाठी संबंधित कार्यालयात चकरा मारत आहेत. धडक सिंचन विहीर कार्यक्रम सन २०१९-२० उपविभागाअंतर्गत पवनी तालुक्याला एकूण ११७ विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यात १२ विहिरी पूर्ण झाल्या असून ८२ विहिरींचे कामे सुरू आहे. तर ३५ विहिरींचे काम मुदतवाढ न मिळाल्याने सुरूच झाले नाही .
पवनी तालुक्यात विहिरी बांधकामासाठी २ कोटी २0 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. परंतु, आतापर्यंत ७२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून ६५ लाख रुपयांचे देयके बाकी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या, त्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. घेतलेले पैसे कसे फेडायचे, हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.आज तरी निधी आला असेल या आशेने शेतकरी दररोज संबंधित कार्यालयात चकरा मारताना दिसत आहेत.
ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या, परंतु ३० जून २०२० पर्यंतच मुदतवाढ असल्याने त्यांच्याही आशेवर पाणी फेरल्या गेले. मुदतवाढ न मिळाल्याने ३५ लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने प्रलंबित असलेला निधी देवून व विहीर बांधकामास मुदत देवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत.
कोट बॉक्स
शेतकऱ्यांनी विहिरी बांधल्या. परंतु, निधी नसल्याने देयके प्रलंबित आहेत तर मंजूर असलेल्या विहिरी मुदतवाढ नसल्याने बांधकाम करता येत नाही .
- दीपक कावळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि. प.उपविभाग पवनी.
कोट बॉक्स
माझी विहीर मंजूर असून तिचे बांधकाम करावे, या विचारात असताना मुदतवाढ नसल्याने बांधकाम करू शकत नाही.
-काशिनाथ कावळे, लाभार्थी शेतकरी,भुयार