राष्ट्रीय महामार्गाचे शहरात लवकरच विस्तारीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:02 PM2018-12-21T23:02:06+5:302018-12-21T23:02:42+5:30

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

The expansion of the National Highway soon in the city | राष्ट्रीय महामार्गाचे शहरात लवकरच विस्तारीकरण

राष्ट्रीय महामार्गाचे शहरात लवकरच विस्तारीकरण

Next
ठळक मुद्दे८७ कोटींचा निधी : फुलमोगरा ते कारधा टोलनाका

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच या महामार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुंबई-कोलकाता या महामार्गावर अहोरात्र वाहतूक सुरू असते. भंडारा येथे बायपास नसल्याने शहराच्या मध्यभागातून ही वाहतूक सुरू असते. अवजड वाहतुकीसह ट्रेलर धावत असतात. शहरातील या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध कार्यालय आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भंडारा शहर विस्तारले आहे. त्यामुळे नागरिकांना हा महामार्ग ओलांडूनच जावे लागते.
अहोरात्र वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घ्यावा लागतो. वाहतूक पोलिसांची चौकात नियुक्ती असली तरी वाहतुकीची कायम कोंढी असते. अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या सर्वावर उपाय करण्यासाठी भंडारा येथील नागरिकांनी वारंवार महामार्ग प्राधीकरणाकडे मागणी केली. एक तर भंडारा शहराला बायपास आणि दुसरे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण करावे, अशीही मागणी आहे.
सध्या शिंगोरी फाटा ते बेला हा १० कि़मी. चा मार्ग दुपदरी आहे. त्यावरूनच ही वाहतूक सुरू होते. एखादा अपघात झाल्यास तासनतास वाहतुकींची कोंडी होते. महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी अनेक प्रस्ताव पाठविण्यात आले. ते कुठे गेले हे कळले नाही. रस्त्याचे मोजमाप झाल्यानंतरही शासन मान्यता मिळत नसल्याने संभ्रम कायम होता. दरम्यान महामार्ग प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. नमेके काम कधी सुरू होणार हे मात्र खात्रीशीरपणे कुणीही सांगत नाही.
भंडाऱ्यात बायपास
जिल्हा मुख्यालयाचे केंद्रबिंदू असलेल्या भंडारा शहरातून उड्डाणपूल होणार ही आशा मावळली आहे. भंडारालगतच्या कोरंभी परिसरातून हा बायपास मार्ग निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय वैनगंगा नदीपात्रात नवीन पुलाची निर्मितीही करण्यात येईल. याला प्रशासकीय स्तरावर दुजोरा देण्यात आला असून शहरातील विस्तारीकरणाच्या कामाला यासोबतच प्रारंभ होईल.

Web Title: The expansion of the National Highway soon in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.