प्रवासी निवाऱ्याला रापनी बसेसचा ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:51 AM2018-02-02T00:51:44+5:302018-02-02T00:52:39+5:30
तुमसर- बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात असणाऱ्या प्रवासी निवाऱ्याजवळ रापनीचे बसेस थांबत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर- बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात असणाऱ्या प्रवासी निवाऱ्याजवळ रापनीचे बसेस थांबत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हरदोली गावात असणारा प्रवाशी निवारा दुर्लक्षित असल्याने गावातील टि-पॉर्इंटवर प्रवासी वाहनाचे थांबा होते. परंतु टी पॉर्इंटचे मार्ग अपघाताला आमंत्रण देणारे असल्याने प्रवाशांना सुरक्षितता देण्यासाठी सरपंच नितीन गणवीर यांनी पुढाकार घेतला आहे. तुमसर -बपेरा राज्य मार्गावरील प्रवाशी निवाऱ्यांची स्वच्छता तथा रंगरंगोटी केली आहे. गावात असणाऱ्या या प्रवाशी निवाºयात प्रवाशांचे बैठकीची व्यवस्था केली आहे. या कार्यात गावातील तरुणांनी सहकार्य केले. यामुळे या प्रवाशी निवाऱ्यात शाळकरी विद्यार्थी, प्रवासी बसची प्रतिक्षा करीत आहेत. प्रवाशी निवाऱ्यात उभे असणारे प्रवाशी रापनीचे बसेसला हात दाखवित असले तरी बसेस थांबा देत नाही. यामुळे प्रवासी निवाºयापासून ५०० मीटर अंतरावर जुने टी-पॉर्इंट आहे. याच टी-पॉर्इंटवर बस थांबा देत आहे. यामुळे वाहनाची वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात तुमसर आगार प्रमुखांना सहकार्याची अपेक्षा ठेवून निवेदन देण्यात आले आहे. पंरतु रापनी बसेस वाहक आणि चालक ऐकायला तयार नाही. यामुळे गावकऱ्यांत नाराजीचा सुर आहे. या प्रवासी निवाºयात अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपचांयत प्रशासनाने दिली.
प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी रापनी बसेसचा थांबा देण्यासाठी निवेदन दिली आहेत. पंरतु वाहक ऐकत नाही. जुन्याच जागेत बसेस ना थांबा देत आहे. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे.
- नितीन गणविर,
सरपंच, हरदोली