हिवाळी अधिवेशनात पर्यटन विकासाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:27+5:30

भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी यांचे उदासिन धोरणाचा फटका पर्यटन स्थळाला बसला आहे.

Expect tourism development at winter convention | हिवाळी अधिवेशनात पर्यटन विकासाची अपेक्षा

हिवाळी अधिवेशनात पर्यटन विकासाची अपेक्षा

Next
ठळक मुद्देग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ : दुसऱ्या टप्प्यातील कामे अडली, विकास कार्याची गरज

रंजीत चिंंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील ग्रीनव्हेली चांदपूर पर्यटन स्थळाचा रखडलेला विकास मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. यामुळे विकास कार्यांना मंजुरी देण्याची गरज आहे. गत पाच वर्षापासून विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी यांचे उदासिन धोरणाचा फटका पर्यटन स्थळाला बसला आहे. नवीन निविदा निघाल्या नाहीत, तर इको टुरिझम व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गोंधळात पर्यटन स्थळाचा विकास लांबणीवर गेला आहे.
राज्य शासनाच्या हिरव्या झेंडीची प्रतीक्षा करीत असणाऱ्या पर्यटन स्थळाला उपेक्षित ठेवण्यात आले आहे. सन २०१४ पर्यंत पर्यटन विकास कार्यावर निश्चित यंत्रणेची घोषणा करण्यात आली नाही. यामुळे विकासाला गती मिळाली नाही. १०० पेक्षा अधिक तरूणांना रोजगार आणि परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत करण्याची क्षमता या पर्यटन स्थळात असताना विकास कार्य डोक्यावर घेण्यात आले नाही.
माजी आमदार चरण वाघमारे यांनी पर्यटन स्थळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत १ कोटी ८५ लाख रूपयाचा निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटन स्थळात केवळ विश्रामगृहाचे बांधकाम सुरू आहे. यानंतर जलाशय परिसरात कामे सुरू करण्यात आली नाही. विदर्भातील समस्या आणि प्रश्न सोडविण्याकरिता नागपुरात हिवाळी अधिवेशनात पर्यटन स्थळाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. जलाशयात बोटींग व्यवसाय, जलतरण प्रशिक्षण तथा जंगल सफारीसाठी चांदपुरात सकारात्मक वातावरण आहे. याशिवाय गावात विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या जागृत हनुमान देवस्थान तिर्थस्थळ, चांद शा वली दरगाह, ऋषी मुनी आश्रम व चांदपूर गावाची संस्कृती आहे. राज्य शासनाने या गावाचे विकास कार्यात मदत करण्याची गरज आहे.

नद्यांचे काठ विकसित करा
वैनगंगा, बावनथडी नद्यांचे काठ विकसित करण्याची गरज असून पर्यटन स्थळाला मोठी चालना मिळणार आहे. गावांचे विकास कार्य भरभराटीला येणार असून पर्यटन स्थळाच्या विकास कार्यासाठी आमदार राजू कारेमोरे सकारात्मक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

चांदपूर पर्यटन स्थळाच्या विकासाने परिसरातील अर्थव्यवस्था मजबूत होणार असून रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता प्रत्यक्षपणे विकास झाले पाहिजे.
-किशोर रहांगडाले, बिनाखी.
पर्यटन आणि तिर्थस्थळाच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. हिवाळी अधिवेशनात विकास कार्य मार्गी लावण्याची गरज आहे.
-उर्मिला लांजे, सरपंच, चांदपूर.

Web Title: Expect tourism development at winter convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.