सणासुदीत शेतकऱ्यांच्या घामाला अपेक्षित दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:19+5:30

भंडारा जिल्हा धानपिकासोबत भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात येथील शेतकरी अडकला आहे. महापूर आणि अतिवृष्टीने धान उद्ध्वस्त झाले. आता शेतकऱ्यांची आशा केवळ भाजीपाला पीकावर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला योग्य दर मिळत नव्हते. मात्र गत आठ दिवसात चित्र पालटले. भाजीच्या दरात तेजी आली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी तारले आहे.

Expected price for farmers' sweat during the festival | सणासुदीत शेतकऱ्यांच्या घामाला अपेक्षित दाम

सणासुदीत शेतकऱ्यांच्या घामाला अपेक्षित दाम

Next
ठळक मुद्देभाजीपाला उत्पादक सुखावला : किमान महिनाभर असाच दर मिळावा अशी आशा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गाचा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना सध्या भाजीपाला पिकाने उभारी दिली आहे. दसरा - दिवाळीच्या पर्वात शेतकऱ्याच्या घामाला अपेक्षीत दाम मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी सुखावला असून किमान महिनाभर असाच दर मिळेल असा अंदाज येथील बीटीबी सब्जीमंडीत व्यक्त केला जात आहे.
भंडारा जिल्हा धानपिकासोबत भाजीपाल्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात येथील शेतकरी अडकला आहे. महापूर आणि अतिवृष्टीने धान उद्ध्वस्त झाले. आता शेतकऱ्यांची आशा केवळ भाजीपाला पीकावर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला योग्य दर मिळत नव्हते. मात्र गत आठ दिवसात चित्र पालटले. भाजीच्या दरात तेजी आली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. चांगले बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी तारले आहे. सध्या भंडारा येथील बीटीबी सब्जीमंडीत घाऊक दरात वांगे ३० - ३७ रुपये, मिरची ५०- ६०रुपये, सांभार ५० - ८० रुपये, टोमॅटो ३० - ३५ रुपये, चवळी ४० ते ५० रुपये, कारले ४५ - ५० रुपये, गवार ८० रुपये, पत्ताकोबी ३० रुपये, भेंडी ३०-३५ रुपये प्रती किलो दराने व्यापारी खरेदी करीत आहे.
बीटीबी सब्जीमंडीच्या व्यापारी वर्गाने आखलेली दुरदृष्टी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरत आहे. जिल्ह्यात भाजीपाला विकुन इतर जिलह्यातही पाठविला जातो. त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळत आहे. योगायोगाने मागणी अधिक व पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगले दिवस आले आहे. कोरोनसारख्या महामारीत बीटीबी सब्जीमंडीने शेतकऱ्यांना एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे. बीटीबी सब्जीमंडी शेतकऱ्यांच्या हक्काची असून शेतकरी येथे विश्वासाने माल घेऊन येतात. सध्या भाजी बाजारात योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे. भाजी उत्पादकांच्या प्रगतीत बीटीबीचा मोठा सहभाग आहे.

शेतकरी हा आमचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो. बीटीबीत शेतकरी भाजी विकुण रोख पैसे घेवून जातो. त्यांच्या घामाला सध्या चांगला दर मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनीही भाजीपाला पिकाकडे वळावे.
- बंडू बारापात्रे,
अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी, भंडारा
शेतकरी वर्गाला चांगले दिवस बीटीबी मुळे आले आहे. नजरेसमोर भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत आहे. मी कारल्याचे उत्पादन करीत असून ४५ ते ५० रुपये प्रती किलो दर मिळत आहे. सणासुदीच्या काळात हे चित्र आशादायी आहे.
- प्रकाश मस्के,
शेतकरी डव्वा धारगाव

Web Title: Expected price for farmers' sweat during the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी