स्वच्छता करून रोगराईला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:04 PM2018-04-14T23:04:53+5:302018-04-14T23:04:53+5:30

प्रत्येक कुटुंबाने निरोगी जीवन जगायला हवे. प्रत्येक कुटुंबांतील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे जीवन तंदूरूस्त असायला हवे तरच कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावल्या जाईल.

Expose the disease by cleanliness | स्वच्छता करून रोगराईला हद्दपार करा

स्वच्छता करून रोगराईला हद्दपार करा

googlenewsNext
ठळक मुद्देडोंगरे यांचे प्रतिपादन : सोनी येथे आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रत्येक कुटुंबाने निरोगी जीवन जगायला हवे. प्रत्येक कुटुंबांतील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे जीवन तंदूरूस्त असायला हवे तरच कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावल्या जाईल. याकरिता प्रत्येकांने वैयक्तिक स्वच्छता पाळून रोगराईला हद्दपार करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.
लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयुर्वेदिक दवाखान्यात पार पडलेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. तालुका आरोग्य विभागाचे वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, गट विकास अधिकारी देविदास देवरे, पंचायत समिती सदस्य ठाकरे, सरपंच कल्पना खंडाते, उपसरपंच हरीचंद्र धोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश कुथे, डॉ. निखील डोकरीमारे, डॉ. अनुजा बागडे, डॉ. जया थोटे, डॉ. मुंडले, नेत्र चिकित्सक डूंबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी संजीव नैतामे उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी म्हणाले, प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झालेला आहे. कुटूंबांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापर सुरू केलेला आहे. परंतु आजही बहुतांश ठिकाणी उघडयावर शौचालयाला जाण्याचे प्रमाण वाढतच आहे. हे चित्र बदलविण्यासाठी प्रत्येक कुटूंबांनी शौचालयाचा वापर करून आपल्या गावातून रोगराईला आळा घाला असे आवाहन केले.
८०० रूग्णांवर झाले विविध उपचार
लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील आरोग्य शिबिरात सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सोनी, इंदूरा, चपराळ व अन्य गावातील रूग्णांचा समावेश आहे. अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील डोकरीमारे, स्त्रिरोग तज्ञ डॉ. अनुजा बागडे, बालरोग तज्ञ डॉ.जया थोटे, दंतरोग चिकित्सक डॉ. मुंडले, नेत्र चिकित्सक डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी संजीव नैतामे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. वानखेडे, व अन्य वैदयकीय अधिकारी, सर्व आरोग्य सेवक, सेविका यांच्या चमूने बिपी, शुगर, एचआयव्ही, मुखरोग, गरोदर मातांची तपासणी, दंत चिकित्सा, नेत्ररोग तपासणी, अस्थीरोग तपासणी व लहान बालकांची तपासणी करून सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. ग्रामस्तरावर आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैदयकीय चमूने परिश्रम घेतले.

Web Title: Expose the disease by cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.