सातबारा ऑनलाईन करण्याची मुदत वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:16+5:302021-05-28T04:26:16+5:30

या वर्षीच्या रब्बी हंगामातील उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात पडले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकाच वेळेस धानविक्री ...

Extend the deadline to make Satbara online | सातबारा ऑनलाईन करण्याची मुदत वाढवून द्या

सातबारा ऑनलाईन करण्याची मुदत वाढवून द्या

Next

या वर्षीच्या रब्बी हंगामातील उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात पडले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकाच वेळेस धानविक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही म्हणून शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाईन नोंदणी करून टोकण प्राप्त करुन घेण्याची पद्धत आदिवासी विकास महामंडळाने कार्यान्वित केली आहे. ऑनलाईन करण्याची मुदत १५ मेपर्यंत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीच्या आत कोरोनाचा प्रकोप वाढलेला होता. त्यामुळे तलाठी सजे बंद होते. तसेच खासगी इंटरनेट कॅफेसुद्धा बंद होते. काही दिवसांपर्यंत ती इंटरनेट साईड ओपन होण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे जवळपास ५० टक्के शेतकरी सातबारा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. सात-बारा ऑनलाईन करण्याची मुदतवाढ १५ जूनपर्यंत वाढविण्याच्या मागणीसह या परिसरातील गोठणगाव, केशोरी, इळदा या केंद्रातील साठवून ठेवण्यात आलेल्या खरीप हंगामातील धान्याची तत्काळ उचल करून ही तिन्ही आधारभूत धान खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Extend the deadline to make Satbara online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.