शासन योजना गरजवंतांपर्यंत पोहोचवा
By Admin | Published: April 2, 2017 12:28 AM2017-04-02T00:28:42+5:302017-04-02T00:28:42+5:30
केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे.
नाना पटोले यांचे प्रतिपादन : सुकळीत डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन
चुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यंत्रणेची आहे. देशात डिजीटलचे पर्व सुरू झाले असून ग्रामीण भागातही नागरिक या पर्वात हिररीने सहभाग घेत आहे. विकासाला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. यामुळे देशात वैज्ञानिक विचारसरणीचा उदय होत आहे. नागरिकांना संगणक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
सुकळी नकुल येथील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेत डिजीटल वर्ग खोलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार शिशुपाल पटले, माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, माजी सभापती कलाम शेख, कृउबाचे संचालक राजेश पटले, चांदपुर देवस्थान अध्यक्ष अजय खंगार, पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे, महेश रहांगडाले, अंबादास कानतोडे, बिनाखीचे उपसरपंच देवेंद्र मेश्राम, सरपंच सुशिला रहांगडाले, सचिव आर.के. वैद्य, गटशिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, केंद्र प्रमुख कटणकार उपस्थित होते.
खासदार पटोले म्हणाले, सुकळी नकुल येथील जिल्हा परिषदेची शाळा जिल्ह्यात पहिली "वायफॉय" युक्त शाळा झाली आहे. शाळा लोक सहभाातून डिजीटल करण्यात आली आहे. अन्य शाळांना प्रेरणादायक ठरावे असे उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. डिजीटल वर्ग खोली कुलुपबंद पर्यंत मर्यादीत ठेवण्यात येवू नये, विद्यार्थ्यांनी डिजिटलचे ज्ञान दिले पाहिजे. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी शेतकऱ्यांचे समस्याकडे खासदार पटोले यांचे लक्ष वेधले तर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.एम. तुरकर यांनी केले. संचालन के.एस. चौहान यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.आर. कटरे यांनी केले. (वार्ताहर)