उमरेड-पवनी-कऱ्हांडला गावांच्या जागेत होणार अभयारण्याचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:04 AM2019-08-09T01:04:17+5:302019-08-09T01:06:05+5:30

उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Extension of sanctuary to Umred-Pawani-Khandala village site | उमरेड-पवनी-कऱ्हांडला गावांच्या जागेत होणार अभयारण्याचा विस्तार

उमरेड-पवनी-कऱ्हांडला गावांच्या जागेत होणार अभयारण्याचा विस्तार

googlenewsNext
ठळक मुद्देपरिणय फुके : ६०५ कुटुंबांचे करणार पुनर्वसन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश आज वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वन राज्यमंत्री डॉ. फुके म्हणाले, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या भोवताली अरण्य परिसर वाढत आहे. परिसरात अभयारण्य वाढल्याने या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल. उमरेड, पवनी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ हेक्टर जागेत करता येणार आहे.
संबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने उप विभागीय अधिकारी (एस.डी.ओ) नेमण्यात यावा. यासंबंधी पुढील कारवाई करत असताना उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांमध्ये राहत असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी द्याव्यात. या सूचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभरण्य क्षेत्र अधिसुचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ.फुके यांनी सांगितले.

Web Title: Extension of sanctuary to Umred-Pawani-Khandala village site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.