पोलीस भरतीत अधिवास प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ देण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:39 AM2021-09-05T04:39:59+5:302021-09-05T04:39:59+5:30
पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरती परीक्षा एसआरपीएफचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध होत नसल्यामुळे अधिवास प्रमाणपत्र ...
पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरती परीक्षा एसआरपीएफचे हॉल तिकीट संकेतस्थळावर उपलब्ध होत नसल्यामुळे अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याकरिता दोन दिवसांची मुदतवाढ मिळण्याची विनंती महेंद्र निंबार्ते यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुनील मेंढे यांच्याकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनील मेंढे यांनी कमांडंट हर्ष पोद्दार यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर चर्चा केली आणि लगेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना मेलद्वारे पत्र पाठविले. शासनाने उमेदवारांचे हित लक्षात घेता अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांना दोन दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय त्वरित जाहीर करावा व राज्यातील कोणताही परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खासदारांना निवेदन देताना नगरसेवक आशु गोंडाणे, हेमंत ब्राह्मणकर, मनीष कापगते, मंगेश वंजारी, देवा बोदेले, आकाश वंजारी, सचिन लोहकरे, दीपक वंजारी, सचिन वारवतकर, देवेंद्र गिदमारे, विजय बन्नोडे, अंकित राऊत, साहिल किंदर्ले, नागेश दोनोडकर, रितेश लिल्हारे, देशत कोरणे, प्रशांत येरणे, दुर्वास नेवारे, मयूर कडुकर, मुकेश कापगते, प्रमोद चांदेवार, प्रमोद मोहुर्ले आदी उपस्थित होते.