वाहनांमध्ये तीव्र फोकस लाईटचा नियमबाह्य वापर

By admin | Published: July 7, 2015 12:40 AM2015-07-07T00:40:29+5:302015-07-07T00:40:29+5:30

शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येक जण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतात.

External use of high-speed light in vehicles | वाहनांमध्ये तीव्र फोकस लाईटचा नियमबाह्य वापर

वाहनांमध्ये तीव्र फोकस लाईटचा नियमबाह्य वापर

Next

अपघाताची शक्यता : वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी
भंडारा : शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येक जण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतात. याच हेतूने अनेक जण नियमांचे उल्लंघन करून डोळे दिपविणारे पांढरे हेडलाईट लावत आहेत. परंतु ते इतरांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनाचे पांढरे हेडलाईट डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे लाईट्स असलेली वाहने शहरात सर्रास धावत असतानाही या वाहनांवर अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. शहरात दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच काही अन्य शहरातील वाहनेसुद्धा शहरात दाखल होतात. यामध्ये काही वाहनांना प्रखर असे पांढरे हेडलाईट असल्याचे निदर्शनास येते.
पांढरा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहन चालकांच्या डोळयावर पडत असल्याने वाहन चालकांना काहीच दिसत नसल्याने जागीच थांबावे लागते. अशावेळी अपघातही होतात. या प्रकारच्या घटनांमध्ये नागरिक तक्रारसुद्धा करीत नाही. अपघात होताच वाहन चालक पळूनही जातात. म्हणून या प्रकारचा उलगडा होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर वाहनचालक नेहमीच नाराजी व्यक्त करीत असतात.
शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटारसायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर कारवाई झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही.
वाहनांना असणाऱ्या पांढऱ्या हेडलाईटमुळे पडणाऱ्या तीव प्रकाशाने डोळ्यापुढे अंधारी येते. तसेच मोतीबिंदु असणाऱ्यांनाही त्रास होतो. पांढऱ्या हेडलाईटमुळे समोरून येणारे वाहन चालक दचकतात. अशा प्रसंगी अपघात घडण्याची शक्यता अधिक असते.
वाहतूक शाखेने याची गांभिर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)

इतरांना नाहक त्रास?
शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटार सायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर अद्याप कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही.

Web Title: External use of high-speed light in vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.