खर्चित विजेपेक्षा अतिरिक्त भार अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:02 AM2018-11-30T01:02:19+5:302018-11-30T01:03:16+5:30

वीज वापराच्या देयकापेक्षा अतिरिक्त रकमेचा भार अधिक वाढत असल्याने घरगुती वीज ग्राहकांत संताप आहे. दर महिन्याला या रकमेतून लूट करण्यात येत असल्याचा आरोप तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केला आहे.

Extra load more than exposed electricity | खर्चित विजेपेक्षा अतिरिक्त भार अधिक

खर्चित विजेपेक्षा अतिरिक्त भार अधिक

Next
ठळक मुद्देवीज ग्राहकांत संताप : स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वीज वापराच्या देयकापेक्षा अतिरिक्त रकमेचा भार अधिक वाढत असल्याने घरगुती वीज ग्राहकांत संताप आहे. दर महिन्याला या रकमेतून लूट करण्यात येत असल्याचा आरोप तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केला आहे.
ग्रामीण भागात आता घरगुती वीज महाग करण्यात आली आहे. युनिट दरात अन्य राज्याचे तुलनेत वाढ करण्यात आली आहे. विजेचा वापर करीत असल्याने युनिट दराचे देयक देण्यात येत असले तरी, यापेक्षा अतिरिक्त दराची लूट अधिक आहे. एका घरगुती वीज ग्राहकाला युनिट दराचे ३८० रूपये दराचे वीज देयक आहे. परंतु या ग्राहकाला अतिरिक्त दराची रक्कम अधिक आहे. यात स्थिर आकार ८० रूपये आहे. या आकारात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. महिन्याकाठी महावितरण कंपनीला देण्यात येणारा हा शुद्ध नफा आहे. कोट्यवधी रूपये या शुद्ध नफ्यातून गोळा करण्यात येत आहे. या ग्राहकांचे वीज देयकांत वहन आकार १४५ रूपये घेण्यात आले आहे.
आयात करण्यात येणारे शुल्क ग्राहकाकडून वसूल करण्यात येत आहे. या शिवाय इंधन समायोजन आकार ३१ रूपये असून या रकमेची वसुली कळेनाशी झाली आहे. यामुळे दर महिन्यात वसुलीचा आकडा फुगत असताना कुणी बोलत नाही. दर महिन्याला विजेचे देयक करित असताना मात्र १६ टक्के व्याज राशी आकारली जात आहे. या ग्राहकांचे १०२ रूपये वीज शुल्क अशी नोंद करण्यात आली आहे.
वीज वापराचे देयक ३८० रूपये असले तरी अतिरिक्त देयक ३५९ रूपये आहे. दर महिन्याला या अतिरिक्त देयकाचे राशीत चक्रावून सोडणारी वाढ होत आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या दरा प्रमाणे स्थिर आकारात चढ उतार करण्यात येत नाही. दरम्यान ग्रामीण भागात वाढत्या विजेच्या देयकामुळे घरगुती वीज ग्राहकाकडे थकबाकी वाढत आहे. महिना भराचे थकबाकी असताना वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे. शासन स्तरावर ग्रामीण भागात अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे प्रयत्न करण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात भरमसाठ वीज देयकामुळे गावात आता प्रकाशकडून अंधाराकडे असे चित्र निर्माण झाले आहे.
शासन स्तरावर वीज देयकांत सूट देण्याची गरज असून अन्य राज्याचे स्वस्त दरात वीज उपलब्ध करणारे धोरण राबविण्याची मागणी उर्जा मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देवेंद्र मेश्राम, अंबादास कानतोडे, अजय खंगार यांनी केली आहे.

Web Title: Extra load more than exposed electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज