पुलवामा घटनेचा जिल्ह्यात तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 09:42 PM2019-02-15T21:42:26+5:302019-02-15T21:43:04+5:30

जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्याचा जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेत वीर मरण आलेल्या शहीद जवानांना ठिकठिकाणी साश्रृनयनांनी आदरांजली वाहण्यात आली. शाळा-महाविद्यालयासह सार्वजनिक स्थळी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Extreme protest in the district of Pulwama | पुलवामा घटनेचा जिल्ह्यात तीव्र निषेध

पुलवामा घटनेचा जिल्ह्यात तीव्र निषेध

Next
ठळक मुद्देठिकठिकाणी वाहिली शहिदांना श्रद्धांजली : दहशतवाद्यांचा बिमोडासाठी एकजुटीचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्याचा जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेत वीर मरण आलेल्या शहीद जवानांना ठिकठिकाणी साश्रृनयनांनी आदरांजली वाहण्यात आली. शाळा-महाविद्यालयासह सार्वजनिक स्थळी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पुलवामा येथे घडलेल्या वीर जवानांच्या मृत्युला कारणीभूत असलेल्यांना कदापी माफी न करता जवारांचे हौताम्य व्यर्थ जाणार नाही, असा सूरही श्रद्धांजली सभेतून व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयातही भारत मातेच्या वीर शहीदांना आदरांजली व्यक्त करून दोन मिनिटे मौन बाळगूण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भंडारा येथे बीटीबी सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन तसेच हिंदू रक्षा मंचच्या वतीने शहरातून रॅली काढून दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत दहशतवादी हल्ल्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
विशेष म्हणजे रॅलीचे समारोप महात्मा गांधी चौकात करण्यात आला. येथे सर्वांच्या वतीने शहीदांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. याचवेळी बीटीबीच्या वतीने गांधी चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी बीटीबीचे अध्यक्ष बंडूभाऊ बारापात्रे, नगरसेवक संजय कुंभलकर, मंगेश राऊत, कृष्णा उपरीकर, लहानशा मंदूरकर, ललीत नागरीकर, दामू गोटेफोडे, रवी राऊत, संजू पराते, धनराज नागरीकर, सुरेश गायधने, प्रशांत मानकर, महेंद्र मेंढे, शिव आजबले, अजय भोंगाडे, अजय भोंगाडे, इमरान शेख, शबीर शेख, किरण भेदे, बाळा निखाळे, आसिफ खान, शेखर भाईत, जितू कळंबे, संजू चव्हाण, रामू माथनीकर, प्रदीप दिवे, सुधीर धकाते, मनोज कोल्हे, सुखराम अतकरी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनीही शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातही ठिकठिकाणी शहीदांप्रती संवेदना व्यक्त करीत पुलवामा घटनेचा निषेध करण्यात आला. सरकारने यावर गंभीर पाऊले उचलावी, अशी मागणी करण्यात आली.
पवनी : येथील गांधी चौकात सायंकाळी सर्व पक्षीय सभा आयोजित करण्यात आली होती. यात पुलवामा येथील दुदैर्वी घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशफाक पटेल, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, बसपाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर, राष्ट्रवादी पक्षातर्फे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, रिपब्लिकन पक्षाचे हंसराज रामटेके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. अनिल धकाते, पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, माजी नगराध्यक्ष रघुनाथ पिपरे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे, डॉ. विक्रम राखडे, तालुका वकील संघाचे अ‍ॅड एल. के. देशमुख, जिल्हा मत्स्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, मनोहर मेश्राम,आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई या सर्वांनी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध केला. भारताच्या सीमेलगत असलेल्या दहशतवादी स्थळावर आक्रमक करुन ते नष्ट करावे.
भारतीयांनी शांत बसून चालणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. भाजपा किसान मोचार्चे राजेंद्र फुलबांधे, नगरसेवक अनुराधा बुराडे, शोभना गौरशेट्टीवार, प्रा उषाकिरण सुर्यवंशी, अमोल तलवारे, दत्तू मुनारत्तीवार, डॉ. सुनिल जीवनतारे, महादेव शिवरकर व सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सामुहिक श्रद्धांजली अर्पण करुन सभेचा समारोप करण्यात आला. श्रद्धांजली सभेचे संचालन सुरेश अवसरे यांनी केले. तसेच गांधी चौकात अभाविपतर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अभाविपचे स्रेहांकीत गोटाफोडे, अखिल मुंडले, अलताफ शेख, अमोल लांजेवार, सौरभ मेश्राम, अजिंक्य खांदाडे, हिमांशु थोटे, निशांत नंदनवार, वैभव बावनथडे, स्पंदन भांबोरे उपस्थित होते. भंडारा तालुक्यातील मानेगाव येथे ग्रामस्थांनी घटनेचा निषेध करीत पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन केले.

Web Title: Extreme protest in the district of Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.