कामगार कल्याण येथे नेत्र तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:21+5:302021-09-19T04:36:21+5:30
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक भगीरथ धोटे होते. विशेष उपस्थितीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त ...
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक भगीरथ धोटे होते. विशेष उपस्थितीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, कामगार कल्याण अधिकारी कांचन वाणी, नेत्रतज्ज्ञ डाॅ.विशाखा जिभकाटे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कामगार कार्यालय भंडारा येथील सहकारी कामगार अधिकारी मंगलदास गांगुर्डे, नगरपरिषद भंडारा येथील माजी सभापती गीता सिडाम, सामाजिक कार्यकर्ते संजय जोशी, कामगार कार्यालय भंडारा येथील मनीष खंडेल, प्रा.कांचन कावरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक नंदलाल राठोड यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात कामगारांसाठी विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम आर्थिक लाभाच्या योजना वगैरे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राबवित आहे. त्याचा पुरेपूर फायदा सर्व कामगार व कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन केले, तसेच कामगारांची नोंदणी ऑनलाइन झाल्याचे बोलले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र संचालक राजकुमार वंजारी यांनी केले. कार्यक्रमात १०५ नागरिकांनी सहभागी घेतला. यशस्वितेकरिता सहायिका दुर्गा गोल्लर, केंद्र उपसंचालिका संगीता नागमोते, ग्रंथपाल मंदा सेलोकर व उषा मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.