बनावट दारूची तस्करी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 10:29 PM2019-04-04T22:29:00+5:302019-04-04T22:29:26+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते.

Fake fake liquor smuggling | बनावट दारूची तस्करी जोमात

बनावट दारूची तस्करी जोमात

Next
ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : मोघम कारवायांमुळे तस्करी फार्मात, अनेकांनी केले साठे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते. मोघम कारवायांमुळे तस्करांच्या हालचाली गतिमान झाल्या असून अनेकांनी बनावट, गावठी दारूचे साठे केले आहे.
कोणत्याही निवडणुकीत दारु ही ठरलेली असते. आताची लोकसभा निवडणूकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी दारुचे साठे केले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागला असून कार्यकर्त्यांच्या जेवणावळी सुरू करण्यात आल्या आहेत. पोलिस विभागाकडून आचारसंहिता लागू झाल्यापासून दररोज नाकाबंदी, गावठी दारु, जुगार अड्डयांवर कारवाई सुरु आहेत. मात्र, या कारवाया अगदीच मोघम स्वरुपाच्या आहेत. केवळ कारवाईचा देखावा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
पोलिसांनी हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त केले असले तरी हातभट्टीच्या दारूची निर्मिती आणि तस्करी जोमात सुरू असल्याचेच दिसून येत आहे. जिल्ह्यात आंतरराज्य सिमेवर तपासणी नाकेही उभारण्यात आले आहेत. तरीही तस्करी सुरू असल्याचेच चित्र आहे. कार्यकर्ते, मतदारांना खूश करण्यासाठी दारूचे साठे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. दारूची चोरटी विक्री करणाऱ्यांकडील दारू बनावट असल्याचीही काहींची तक्रार आहे. ढाब्यांवर सर्रास दारु विक्री केली जात आहे. शिवाय तेथे दारु पिण्यासही खुली परवानगी दिली जात आहे. त्यामुळे अशा ढाब्यांवर गर्दी वाढत आहे.
जिल्हा पोलिसांकडून अवैध दारु अड्डे उद्ध्वस्त केले जात असताना उत्पादन शुल्क विभागाचे मात्र दारु तस्करीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही राज्य लागून आहेत. या राज्यातून बनावट दारुचा पुरवठा जिल्ह्यात होत असतो. परंतु, अजूनही उत्पादन शुल्क विभागाला या तस्करांचा शोध घेता आला नाही. शिवाय निवडणुकीच्या कालावधीत या विभागाकडून कोणतीही मोठी कारवाई करण्यात आली नाही.
जिल्ह्यातील अनेक बारमध्ये मिळणाऱ्या दारूमध्ये फरक असल्याचीही चर्चा आहे. कोणत्याही एका ब्रँडची दारू प्रत्येक बारमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये रंगामध्ये तसेच चवीमध्येही बदल जाणवत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
त्यामुळे अनेकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूचा साठा केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क संबंधित बार, दुकाने यांचा स्टॉक तपासून त्यांच्याकडून विक्री केली जाणाºया दारूची तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Fake fake liquor smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.