निवडणूक काळात आढळली नकली नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:04 PM2019-03-26T22:04:59+5:302019-03-26T22:05:19+5:30

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना ठाणा येथे २०० रुपयाची नकली नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृहकराची रक्कम ग्रामपंचायतचा कर्मचारी बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Fake notes found during the election period | निवडणूक काळात आढळली नकली नोट

निवडणूक काळात आढळली नकली नोट

Next
ठळक मुद्देगृहकर वसुलीची रक्कम : बँकेत आला प्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना ठाणा येथे २०० रुपयाची नकली नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृहकराची रक्कम ग्रामपंचायतचा कर्मचारी बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सदर २०० रुपयाची नोटेत वॉटरमार्क मध्ये गांधीजींचा फोटो दिसत नाही. तसेच हिरव्या उभ्या पट्टीत आरबीआय असेही लिहिलेले नाही. तसेच सामान्य २०० रुपयाच्या नोटेपेक्षा २ एमएम आकाराने ही नोट लहान आहे.
ठाणा ग्रामपंचायतीचे कर्मचारी गृहकराची वसुली केलेली रक्कम भरण्यासाठी बँकेत गेले असता संबंधित कॅशियरने ही नोट नकली असल्याचे सांगून परत केले. विशेष म्हणजे याबाबत कुठेही तक्रार करण्यात आली नाही. मात्र लोकसभेच्या काळात बनावट नोटा तर चलनात आल्या नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. परिसरात याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.

Web Title: Fake notes found during the election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.