खोट्या दाखल्यावर रक्कम हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:47 AM2017-10-08T00:47:00+5:302017-10-08T00:47:10+5:30

भूमीधारक महिलेला दोनच अपत्य असल्याचे खोटे वारसान प्रमाणपत्र तयार करून भूसंपादनाची रक्कम हडप केली. याप्रकरणी अन्यायग्रस्त ताराबाई नेरकर यांनी त्रिमुर्ती चौकात आमरण उपोषन सुरू केले आहे.

 False money on the false statement | खोट्या दाखल्यावर रक्कम हडपली

खोट्या दाखल्यावर रक्कम हडपली

googlenewsNext
ठळक मुद्देताराबाई नेरकर यांचे आमरण उपोषण : दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भूमीधारक महिलेला दोनच अपत्य असल्याचे खोटे वारसान प्रमाणपत्र तयार करून भूसंपादनाची रक्कम हडप केली. याप्रकरणी अन्यायग्रस्त ताराबाई नेरकर यांनी त्रिमुर्ती चौकात आमरण उपोषन सुरू केले आहे.
गोसेखुर्द विशेष पॅकेज अंतर्गत २०१४ मध्ये अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी तत्कालीन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांनी पारबता महादेव शहारे यांच्या नावाने असलेल्या जमिनीचा मोबदला पुरूषोत्तम शहारे व वसंता शहारे यांना दिला.
तत्पूर्वी ग्रामपंचायत सुरेवाडा यांनी दिलेल्या वारसान दाखल्यावरून तलाठी यांनी कागदपत्रे जमा करून भूसंपादनाची रक्कम देण्यासाठी सदर प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे पारबता शहारे यांची मुलगी ताराबाई यांना भुसंपादनाच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले.
खोट्या पुराव्याच्या आधारे व कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता शासनाने पुरूषोत्तम शहारे व वसंता शहारे यांना तीन लाख २२ हजार ८१९ रूपये अनुदान दिले. ही बाब ताराबाई नेरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात न्याय मिळावा यासाठी उंबरठे झिजवित आहेत. मात्र त्यांना येथील अधिकारी दाद देत नसल्याने ताराबाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असलेल्या अधिकारी व अनुदानाची रक्कम लाटणाºयांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ताराबाई नेरकर यांनी केली आहे.

Web Title:  False money on the false statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.