जगभरात बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती महान

By admin | Published: February 4, 2016 12:44 AM2016-02-04T00:44:19+5:302016-02-04T00:44:19+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या रूढी, परंपरा विरूद्ध एल्गार पुकारून मानवाला मानवाची ओळख निर्माण करून दिली.

The fame of Babasaheb Ambedkar is great all over the world | जगभरात बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती महान

जगभरात बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती महान

Next

भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या रूढी, परंपरा विरूद्ध एल्गार पुकारून मानवाला मानवाची ओळख निर्माण करून दिली. अंधश्रद्धेने गुरफटलेल्या नागरिकांना वैज्ञानिक धम्म दाखविला. त्यांची अंमलबजावणी करणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची किर्ती महान आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय तथा विशेष सहाय मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.
बोधिचेतीय संस्थान चिखली (हमेशा) राजेगाव एमआयडीसी खुटसावरी मार्गावरील पर्यटन व निसर्गरम्य स्थळी आयोजित बौद्ध भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांची १११ वी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वा जयंती पर्व व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमांच्या उद््घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. त्यांनी बाबासाहेबांच्या दिल्ली, लंडन, मुंबई येथील निवासस्थानाची महती पटवून धम्मचक्राला गती द्या, असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, तहसिलदार सुशांत बन्सोडे, भीम कौशल चंद्रबोधी पाटील, गजेंद्र गजभिये, प्रा. वासंती सरदार, इंजि. जगदिश येळे, अ‍ॅड. एकनाथ रामटेके, भदंत वण्णा स्वामी, भदंत सत्यशील, भदंत संघरत्न माणके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो यांनी केले.
तत्पूर्वी पंचशील ध्वजारोहण करून खुटसावरी मार्गाने धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप बोधिचेतीय विहारात करण्यात आली. धम्मध्वजाला गजेंद्र गजभिये यांनी मानवंदना दिली. त्यानंतर प्रशिक बुद्ध भीम गायन मंडळ यशवंत ग्राम चिचटोला येथील चमुंनी स्वागत गीत गायन केले. तसेच नृत्य करून स्वागत कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी दिलेल्या दानदात्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रात्रीला 'भीमरायाची सावली' या धार्मिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सुष्मा वासनिक, आदेश बांबोडे, चांगुना कांबळे, चित्रलेखा मेश्राम, यशोधरा खोब्रागडे, अर्चना खोब्रागडे, रत्नमाला वासनिक, मालती गडकरी, उज्वला बोरकर, रचना वैद्य, संगिता हुमणे, सुरेश बोरकर, द्वारका कानेकर, शुक्रतारा गजभिये, लता उके, कविता पाटील, कुंदा बारसागडे, रेशमा बोरकर, मालन गोंडान्ने, पार्वती गायकवाड, पुरूषोत्तम तिरपुडे, कला बांबोडे, विमल तिरपुडे, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, ईश्वर शेंडे, मंगेश शेंडे, निखिल हुमणे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The fame of Babasaheb Ambedkar is great all over the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.