अतिक्रमणाचे विळख्यात तलाव

By admin | Published: March 28, 2017 12:19 AM2017-03-28T00:19:41+5:302017-03-28T00:19:41+5:30

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे.

The famous lake of encroachment | अतिक्रमणाचे विळख्यात तलाव

अतिक्रमणाचे विळख्यात तलाव

Next

नियोजनाचा अभाव : मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम, लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?
अशोक पारधी पवनी
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद मालकीचे तलाव आहे. त्यासर्व तलावावर सभोवताल लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. भोईतलाव, बालसमुद्र व कुऱ्हाडा असे तीन महत्वाचे तलाव पालिका क्षेत्रात आहेत. तीनही तलाव अतिक्रमणाचे विळख्यात जखडलेले आहेत.
भाईतलाव वॉर्डात असलेले भाईतलाव हे तलाव जिल्हा परीषदच्या मालकीचे आहे. लक्षावधी रूपये खर्च करून शासनाने रोजगार निर्मिती करून तलावाचे खोलीकरण केले. मत्स्य उत्पादनासाठी तलाव वापरात आहे. गेल्या १० वर्षापूर्वी तलाव सर्व बाजूने दिसत होते. आता मात्र पाळीवर चढल्यानंतर सभोवताल अतिक्रमण झालेले तलाव पाहता येते.
सर्व बाजूला अतिक्रमण असल्याने तलावात पाणीसाठा वाढवू शकत नाही त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. प्रसिद्ध असलेल्या परकोटाचे पायथ्याशी बालसमुद्र नावाचे तलाव आहे. एका बाजूला पुरातन असलेली मातीची भिंत (टेकडी) म्हणजेच तलावाची पाळ आहे. दुसऱ्या बाजुला जगन्नाथ मंदीर, चंद्रमनी विहार व पर्यटन संकूल आहे. उर्वरित दोन बाजूवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.
पवनी-निलज रस्त्याचे बाजुला प्रसिद्ध असलेले कुऱ्हाडा तलाव. तलावाचे पाळीवर लोकांनी राहत्या घरासाठी व लहान लहान उद्योगासाठी अतिक्रमण केलेले आहे. तलावाची दुसरी बाजू म्हणजे बस्तरवारी व बेलघाटा वॉर्ड. या भागात लोकांनी रहाण्यासाठी घर बांधताना तलावाचे मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.
या तलावाचे खोलीकरणासाठी शासनाने लक्षावधी रूपये खर्च केले. परंतू पाणीसाठा वाढविण्यासाठी खोलीकरणाचा उपयोग झालेला नाही. कारण जिथे पाणी पसरावा अशाच ठिकाणी अतिक्रमण करून लोकांनी घर बांधलेले आहेत.
भरघोष मत्स्य उत्पादनासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भविष्यात तलावाचा पाणीसाठा कमी होवून त्याचा मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: The famous lake of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.