गांधी सागर तलाव समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:03 PM2018-04-03T22:03:31+5:302018-04-03T22:03:31+5:30

तुमसर शहरातील प्राचीन गांधी सागर तलावाच्या सभोवतली मोठ्या प्रमाणात शहरासह अन्य भागातील केर केचरा फेकला जात आहे. त्यामुळे तलाव बुजविण्याचा प्रयत्न तर नगर पालिका करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Famous stories of Gandhi Sagar Lake | गांधी सागर तलाव समस्यांच्या विळख्यात

गांधी सागर तलाव समस्यांच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देकेरकचऱ्याने सौंदर्य बाधित : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरातील प्राचीन गांधी सागर तलावाच्या सभोवतली मोठ्या प्रमाणात शहरासह अन्य भागातील केर केचरा फेकला जात आहे. त्यामुळे तलाव बुजविण्याचा प्रयत्न तर नगर पालिका करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. तलावाचा जवळपास २५ मीटर भाग बुजविण्यात आलेला आहे. जलस्तरात वाढ व्हावी त्याकरीता या तलावातील गाळ व पसरलेली घान स्वच्छ करुन आवर कुंपन घालण्याची मागणी करीत मुख्याधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. तत्काळ तलावाची स्वच्छता न केल्यास तोच कचरा नगरपरिषदेत घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गांधी सागर तलावामुळे तेथील राहत असलेल्या नागरिकांचा विहिरींना मुबलक प्रमाणात पाण्याची पातळी असते. परिसरात तलावातील जल साठा उपलब्ध असल्याने पाण्याची समस्या राहत नाही.
तलावामध्ये केर कचरा घातल्यामुळे तलावाच्या सौंदर्य ही बाब दुरच!, गाळ साचल्यामुळे शहरातील जलस्त्रोतांची पाणी पातळी अत्यंत कमी होत आहे.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात प्रयत्नशिल आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अन थेंब अडवायचा, साठवणूक करायची व त्याच ठिकाणी जमिनीत मुरवायचा या करिता शासन कटिबद्ध आहे. परंतु तुमसर शहरातील नगर परिषदेचा अखत्यारीतील गांधी सागर तलाव याला अपवाद ठरत आहे. पालिका पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. सदर प्रकरणामध्ये तुमसर नगर परिषद जवाबदार आहे.
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार या योजनेचा उद्देश भूगभार्तील जलस्त्रोत स्तर वाढविणे, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करणे, पिण्याचा पाणी नगरवासीयांना पुरवठा करणे व उन्हाळ्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करणे हे समाज हिताचे व लोककल्याणकारी हित जोपासणे हे नगर पालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु तुमसर नगर पालिका याला अपवाद आहे.
सदर गांधी सागर तलाव स्वत नगर पालिका भूजवित आहे. त्यामुळे भविष्यात गांधी सागर तलाव नामशेष होईल व तिथे फक्त कचºयाचे ढिगारे राहतील, यात शंका नाही.
गांधी सागर तलावाचे सौंदर्यीकरण करून त्याला सरक्षीत तार कुंपण करावे. या मागणीची दखल न घेतल्यासह शिवसेना पदाधिकारी सदर गांधी सागर तलावाचा अवतीभवती असलेला केर कचरा उचलून नगर पालिकेमध्ये आणून घालेल याची संवेदनशीलपणे व गांभीयार्ने दखल नगर परिषदने घ्यावी, असा इशारा निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, युवासेनेचे मनोज चौबे यांनी दिला.
निवेदन देते वेळी संजू डाहाके, उपशहर प्रमुख कैलाश जलवाने, विभाग प्रमुख हितेश बबवाईक, मनीष करंभे, प्रशांत साठवने, किशोर बिसने, सुमित बडवाईक, धीरज बालपांडे, पवन खवास, नितेश वाडीभस्मे, सागर मिश्रा, नीलेश पाटिल, ईश्वर भोयर सह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Famous stories of Gandhi Sagar Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.